भाजपाच्या अंबाजोगाईत कॉर्नर बैठका व प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी
अंबाजोगाई : बीड लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष व महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ केज विधानसभा मतदार संघाच्या आ.प्रा.सौ. संगीताताई ठोंबरे यांनी गेल्या काही दिवसात झंजावाती प्रचार दौरा सुरू ठेवला आहे. अंबाजोगाई शहरातील विविध प्रभागात जावून आ.ठोंबरे यांनी डोअर-टु- डोअर प्रचारावर भर दिला आहे.शक्य तेथे कॉर्नर बैठका तसेच घरोघरी जावून प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेवून भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे.मंगळवार, दि.9 एप्रिल रोजी अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक 11 व 12 मध्ये भाजपाच्या वतीने आ.प्रा.सौ. संगीताताई ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली.या रॅलीस मतदार, युवक वर्ग व महिला भगिनींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
आ.प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे यांनी मतदारांशी संवाद साधताना म्हटले की,भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी भरिव असा निधी देण्यात आला.जिल्ह्यात तसेच केज विधानसभा मतदारसंघात महामार्गाचे व रस्त्यांचे प्रशस्त जाळे निर्माण करण्यात आले.त्यामुळे विकासाला गती मिळाली आहे.कृष्णा खोर्यातील पाणी मराठवाड्याला मिळविण्यासाठी व ते पाणी धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात आणण्यासाठी आणि गोदावरी नदीचे पाणी सिंदफणा नदीत आणण्यासाठीचे नियोजन सध्या चालु आहे.परळी-बीड-नगर रेल्वे मार्ग लवकरच पुर्ण होईल पुढील काळात धनगर समाजातील तरूणांच्या बेरोजगारीची समस्या सोडविली जाईल.धनगर आरक्षणाचा प्रश्न ही लवकरच सोडविण्यात येईल भाजपा,शिवसेना, रिपाइं,रासप आणि रयत क्रांती सेनेच्या उमेदवार डॉ.प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आ.प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे यांनी केले आहे. आ.प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे यांच्या आवाहनाला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.मा.नरेंद्रजी मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी लोकभावना आहे. पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केज विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत व विकास निधी देण्याबाबतीत सातत्याने झुकते माप दिले आहे. तेंव्हा विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता बीड जिल्हा व केज मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी जनतेने, मतदारांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा संधी द्यावी व प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आ.प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे यांनी केले.
प्रचार रॅलीस भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिलकाका लोमटे, नगरसेवक कमलाकर कोपले,नगरसेवक दिलीपराव काळे, नगरसेवक अनंतदादा लोमटे,नगरसेवक सुरेश कराड,नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे, नगरसेवक हणुमंत तौर, नगरसेवक संजय गंभिरे,प्रशांत आदनाक, रामचंद्रजी झंवर, अॅड.राजेसाहेब लोमटे, डॉ.सुधीर धर्मपात्रे,गणेश देशमुख,शरद कोपले, जनार्धन मुंडे,शैलेश कुलकर्णी अहेमद पप्पुवाले,जहीर पठाण, पुरूषोत्तम ओव्हाळ, महेश शेप,उज्जैन बनसोडे,राहुल कोपले, अनंत मोरे,काशिनाथ हुलगुंडे,प्रेमचंद गायकवाड,शेख वजीर नितीन सराटे तसेच शिवसेनेचे अंबाजोगाई तालुका प्रमुख अर्जुनराव वाघमारे, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हा संघटक अशोकराव गाढवे,शहर उपप्रमुख गणेश जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख वैभव अजले,अॅड.विशाल घोबाळे,विद्यार्थी सेनेचे अभिमन्यु वैष्णव,अक्षय भुमकर,शिवकांत कदम,पप्पु शिंदे, समन्वयक अर्जुन जाधव,सुधाकर काचरे, शंकर भिसे,अशोक काळे,विभागप्रमुख राहुल थावरे,राहुल कोंबडे आदींसहीत भाजपा,शिवसेना, रिपाई, रासप आणि रयत क्रांती सेनेचे विविध कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.