सोयगाव-बनोटी,दि.४ (ज्ञानेश्वर धोंडू पाटील ): महाशिवरात्री निमित्ताने बनोटी येथील अमृतेश्रवर गोमुख संस्थानाच्या शिवमंदीरात सोमवारी (ता.०४)लाखो भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. महाशिवरात्री निमित्ताने पालखी पायी दिंड्या दाखल.
अमृतेश्रवर गोमुख संस्थानाचा पाच दिवशीय यात्रा महोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली असून रात्री बारा वाजता महादेवाला बेल दुधाचा अभिषेक घालून भाविकांनी अमृतेश्रवर शिवमंदीरात दर्शनासाठी गर्दी करीत हरहरमहादेवाच्या जयघोषाने दणादुन गेला होता. मनोकामना पूर्ण झालेल्या भाविकांनी मनोभावे पूजा करून नवस फेडले. शके १८४२ मध्ये माहुजी महाराज यांनी बांधलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या स्थापनेपासून १७७ वर्षाची परंपरा असलेल्या पालखी सोहळ्यात मठाधिपती भानुदास महाराज, विठ्ठल महाराज यांच्या आडगाव, वाणेगाव, निभोंरी येथील पायी पालखी दिंडी दाखल झाल्यानंतर संस्थानाच्या पंचकमेटीने स्वागत केले. पायी पालखी दिंडीचे संपुर्ण गावातून रांगोळ्या, सडा टाकुन स्वागत करीत महाराजांचे पुजन करीत ग्रामस्थांनी दर्शन घेतले. यात्रा महोत्सवाला येणार्या भाविकांसाठी व्यापारी रमेश जैन यांनी फराळाची केली होती तर महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी जेवणाची व्यवस्था धनंजय खैरनार यांनी केली आहे.
0