ब्रेकिंग न्युजमनोरंजन

'बायको देता का बायको' चित्रपटाची झलक...!

मुंबई: 'लग्न' हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण.वयात आलेल्या प्रत्येक युवकाला आपलंही लवकर लग्न व्हावं,सुंदर व सुशील बायको मिळावी आणि आपली जोडी चारचौघात उठून दिसावी अशी इच्छा असते.याच भावनेतून बायकोच्या शोधात निघालेल्या युवकांची कथा सांगणारा 'बायको देता का बायको' हा धमालपट मराठीत येऊ घातला आहे.वाय डी फिल्म्स निर्मित 'बायको देता का बायको' चित्रपटाची पहिली झलक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आली.लग्नपत्रिकेद्वारे प्रदर्शित करण्यात आलेली चित्रपटाची पहिली झलक उत्सुकता वाढवणारी आहे.आंतरपाटाआड एका युवकाची अर्धी झलक पाहायला मिळत असून यावर लिहिलेला मजकूरही चित्रपटाची गंमत व त्यातला महत्वपूर्ण आशय दाखवून देणारा आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश साहेबराव ठाणगे यांचे तर निर्मिती धनंजय रामदास यमपुरे यांची आहे.ऐन लग्नसराईच्या मोसमात धमाल उडवून देण्यासाठी 'बायको देता का बायको' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.