पाटोदा:गणेश शेवाळे― येत्या दहा ते पंधरा दिवसांत बहुचर्चित असणाऱ्या आयोध्या येथे मंदिर का मज्जित होणार याचा निकाल न्यायालयात लागणार असुन न्यायालयात निकाल कोणत्याही बाजूने लागू आपण माञ न्यायव्यवस्थेच्या निकालाचा आदर करावा काही विघ्नसंतोषी लोक या निकालाचे राजकारण करून दोन समाजात तिडा निर्माण करूण पाटोदा तालुक्याची शांतता बिघडू शकतात यामुळे पाटोदा तालुक्यात शांतता कायदा सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून पाटोदा पोलिसांच्या वतीने गुरुवार दि 07/11/2019 रोजी पाटोदा शहरात पायी सशस्र संचलन करण्यात आले.निकालाच्या दिवशी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता बिनधास्तपणे राहावे याकाळात कोणी जातीय दोष पसरू नये म्हणून व गुन्हेगारांवर याकाळात वचक निर्माण व्हावा म्हणून पाटोदा पोलिसांचे शक्तीप्रदर्शन तालुकाभरात कळावा म्हणून पाटोदा शहरात सशस्त्र संचलन करण्यात आले.गुरुवार दुपारी पाटोदा पोलीस ठाणे येथून सशस्र संचलनाला सुरुवात करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक बाजारतळ, छञपती शिवाजी महाराज पोलीस चौक आदींसह अन्य परिसरात दुपारी सशस्त्र संचलन करण्यात आले या पायी सशस्र संचलनात पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने,एपीआय धरणधीर कोळेकर,पोलीस उपनिरीक्षक वैशाली पेटकर मॅडम,यांच्यासह ७५ हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी होते.
0