सोयगाव: ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोमवार दि.15/7/2019 रोजी नियोजित कार्यक्रम जरंडी ता.सोयगाव येथे गरजु विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तके, शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मराठा प्रतिष्ठान चे जिल्हा अध्यक्ष विजय काळे यांनी दिली.
१३,००० हजार वह्या-पुस्तके वाटप करण्याचा हा कार्यक्रम तालुक्यातील गरजु विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मराठा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मा.श्री.सोपान दादा गव्हांडे पाटील यांनी आव्हान केले आहे.
या कार्यक्रमासाठी विषेश अतिथी म्हणून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी ज्यांनी अमाप कष्ट करून आरक्षण मिळवुन देते असे मा.श्री.अँड.विनोद भैय्या पाटील साहेब. यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे स्पष्ट केले.
तसेच पोलीस निरीक्षक श्री.सिताराम म्हेत्रे सर, व
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शकील शेख साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी मराठा प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष विजय काळे,ता.अध्यक्ष विजय चौधरी,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर युवरे,खजिनदार आप्पा वाघ, सचिव सचिन महाजन, प्रसिद्धीप्रमुख समाधान शिंदे,ता.उपाध्यक्ष समाधान जाधव, राहुल सोनी, इ मराठा प्रतिष्ठान पदाधिकारी व कार्यकर्ते कष्ट घेत आहे.
0