अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ.प्रितमताई मुंडे यांना विजयी करा―आ.संगिताताई ठोंबरे

अंबाजोगाईत आ.संगिताताई ठोंबरे यांचा डोअर-टु-डोअर प्रचार

अंबाजोगाई : बीड लोकसभा मतदार संघातील भाजपा,शिवसेना, रिपाइं(आठवले गट), रासप आणि रयत क्रांती सेनेच्या उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ केज विधानसभा मतदार संघाच्या आ.प्रा.सौ. संगीताताई ठोंबरे यांनी गेल्या काही दिवसात अंबाजोगाई शहर व तालुका पिंजुन काढला असून अंबाजोगाई शहरातील विविध प्रभागात जावून आ.ठोंबरे यांनी डोअर-टु-डोअर प्रचारावर भर दिला आहे.शक्य तेथे कॉर्नर बैठका तसेच घरोघरी जावून आ.ठोंबरे या प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेवून भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे.बुधवार,दि.10 एप्रिल रोजी अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय व मेडीकल परिसर,रोहिदास नगर, क्रांतीनगर,लालनगर तसेच सदर बाजाराच्या उर्वरीत भागामध्ये भाजपाच्या वतीने आ.प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅली काढण्यात आली.या रॅलीस मतदार,युवक वर्ग व महिला भगिनींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

अंबाजोगाईत आ.प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे यांनी मतदारांशी संवाद साधताना म्हटले की,भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी भरिव असा निधी देण्यात आला.जिल्ह्यात तसेच केज विधानसभा मतदारसंघात महामार्गाचे व रस्त्यांचे प्रशस्त जाळे निर्माण करण्यात आले.त्यामुळे विकासाला गती मिळाली आहे. भाजपा,शिवसेना, रिपाइं(आठवले गट), रासप आणि रयत क्रांती सेनेच्या उमेदवार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी बीड जिल्हा व केज विधानसभा मतदार संघासाठी सातत्याने विकास निधीच्या बाबतीत झुकते माप दिले आहे. अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील विविध प्रश्नांची सोडवणूक करून ग्रामिण भागातील रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी त्यांनी शासनाकडून निधी मिळवून दिला.या सोबतच अंबाजोगाई, केज आणि नेकनुर या भागात राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. डॉ.प्रितमताई या अभ्यासु उमेदवार असून त्यांना जनतेचे प्रश्न माहिती आहेत व ते प्रश्न सोडवून घेण्यासाठी त्या सक्षम आहेत. तेंव्हा जनतेने त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आ.प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे यांनी केले आहे.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केज विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत व विकास निधी देण्याबाबतीत सातत्याने झुकते माप दिले आहे. तेंव्हा विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता बीड जिल्हा व केज मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी जनतेने, मतदारांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा संधी द्यावी व प्रचंड मतांनी विजयी करावे असे सांगुन आ.प्रा. सौ.संगीताताई ठोंबरे यांनी मा.नरेंद्रजी मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी लोकभावना आहे. देशाचा विकास गतीने होण्यासाठी तसेच बीड व केज मतदारसंघातील आठरापगड जाती धर्माच्या लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपा काम करत आहे.भाजपाचा जाहिरनामा हा विकासाचा वचननामा आहे असे प्रतिपादन आ.प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे यांनी केले.
प्रचार रॅलीस भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिलकाका लोमटे, नगरसेवक कमलाकर कोपले,नगरसेवक दिलीपराव काळे, नगरसेवक अनंतदादा लोमटे,नगरसेवक सुरेश कराड,नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे, नगरसेवक हणुमंत तौर, नगरसेवक संजय गंभिरे, प्रशांत आदनाक, रामचंद्रजी झंवर,मदन परदेशी,अ‍ॅड.राजेसाहेब लोमटे,डॉ.सुधीर धर्मपात्रे,गणेश देशमुख, शरद कोपले,जनार्धन मुंडे,शैलेश कुलकर्णी अहेमद पप्पुवाले,जहीर पठाण,पुरूषोत्तम ओव्हाळ,महेश शेप, उज्जैन बनसोडे,राहुल कोपले,अनंत मोरे, काशिनाथ हुलगुंडे, प्रेमचंद गायकवाड,शेख वजीर नितीन सराटे तसेच शिवसेनेचे अंबाजोगाई तालुका प्रमुख अर्जुनराव वाघमारे,शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हा संघटक अशोकराव गाढवे, शहरउपप्रमुख गणेश जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख वैभव अजले,अ‍ॅड.विशाल घोबाळे,विद्यार्थी सेनेचे अभिमन्यु वैष्णव,अक्षय भुमकर,शिवकांत कदम, पप्पु शिंदे,समन्वयक अर्जुन जाधव,सुधाकर काचरे,शंकर भिसे, अशोक काळे, विभागप्रमुख राहुल थावरे,राहुल कोंबडे आदींसहीत भाजपा, शिवसेना,रिपाइं (आठवले गट),रासप आणि रयत क्रांती सेनेचे विविध कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?



    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.