बीड प्रतिनिधी: बीड तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड व ठेकेदाराने संगनमतानेच बोगस रस्ता करत मनमानी कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१५ एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता मांजरसुंभा-पाटोदा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी मुळुकवाडी फाट्यावर रस्त्याची गुणनियंत्रक विभागामार्फत तपासणी तसेच आधिकारी-ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत निवेदन उप-अभियंता (प्रमंग्रासयो) महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड, मंडळ आधिकारी वंजारे, एपीआय नेकनुर पोलीस स्टेशन शेख मुस्तफा, पीएसआय विलास जाधव, एएसआय निकाळजे,पोना. ढाकणे, पो.ना. सय्यद अब्दुल, पो.ना.डिडुळ, यांना देण्यात आले.
यावेळी आंदोलनात मुळुकवाडी सरपंच कृष्णा पितळे , गजानन रंदवे, भास्कर ढास, कृष्णा ढास, अविनाश रंदवे, सुधाकर मांडवे,अवधुत ढास, हौसराव मोरे, जयराम मांडवे, तुकाराम मांडवे, पंकज मांडवे, दिनकर मोरे, संतोष मांडवे, सुभाष मांडवे, चांगदेव मांडवे, शहादेव मांडवे, महादेव मोहीते, दिपक मांडवे, विजय सोनावणे, भिमराव मांडवे, विठ्ठल जाधव, तुळशीराम काटकर,महादेव मांडवे आदि सहभागी होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामिण रस्ते विकास संस्था बीड अंतर्गत रा.मा.५६ ते मुळुकवाडी-ते मसेवाडी रस्ता सुधारणा कि.मी.०/०० ते ०२/८०० पॅकेज क्रमांक RDBEE-25 ,अंदाजित किंमत १ कोटी २६ लाख रूपये अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात येत नसुन अत्यंत निकृष्ट रस्ता करण्यात आला असून जागोजागी अर्धवट रखडलेला रस्ता असून रस्त्याची जाडी,रूंदी अंदाजपत्रकाप्रमाणे नसुन भोसले वस्तिवरील रस्त्यालगत विहीरीला संरक्षण भिंत नाही तसेच मसेवाडी गावामध्ये ठेकेदार जुन्या डांबरी रस्त्यावर रस्ता न करता मनमानी कारभार करत गोरगरीब ग्रामस्थांच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे.
ग्रामिण भागात दर्जेदार रस्त्यासाठी ग्रामस्थांनी रस्ता सुरू असतानाच अंदाजपत्रकाप्रमाणे करून घेण्याची दक्षता घ्यावी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
ग्रामिण भागातील दळणवळणाची साधने उपलब्ध व्हावीत यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था आधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून थातूरमातूर रस्ता करून निधीचा अपहार करण्यात येत असून अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार रस्ते व्हावेत यासाठी ग्रमस्थांनी दक्षता घेणे गरजेचे असुन रस्ता सुरू असतानाच लक्ष देणे गरजेचे आहे.
महसुल प्रशासनातील आधिका-यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष
___
रस्त्यासाठी वापरली जाणारी खडी अवैध खडीक्रशर द्वारे तसेच मुरूम रस्त्याशेजारील खोदकाम करून साईडपट्ट्यासाठी वापरण्यात येतो मात्र वाहतुक खर्च दुरून आणल्याचा दाखवून शासनाची दिशाभूल व संबधित शासकीय आधिका-यांशी अर्थपुर्ण हितसंबंध जोपासत शासनाचा महसुल बुडवून कोट्यावधी रूपयांचे नुकसान करण्यात येते संबधित प्रकरणात तक्रार केल्यानंतर सुद्धा चौकशी अथवा कारवाई करण्यास आधिकारी उत्सुक नसतात.