अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाराजकारण

राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विजयी करा―राजकिशोर मोदी

अंबाजोगाईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक

अंबाजोगाई (प्रतिनिधी): भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. राहुलजी गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी बीड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस (आय), शेकाप,स्वाभिमानी शेतकरी संघटना, पी.आर.पी.कवडे गट, मानवी हक्क अभियान व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे घरोघर जावून प्रचार करावा असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले.मोदी हे अंबाजोगाईत आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलत होते.

अंबाजोगाई हॉटेल ममता या ठिकाणी सोमवार,दि.8 एप्रिल रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस परळी, अंबाजोगाई,केज, धारुर,माजलगांव या भागातून मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, अंबाजोगाई शहर हे पुरोगामी विचारांना मानणारे शहर आहे.या शहरांने प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिले आहे. यावेळेस लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीड लोकसभा मतदार संघ देण्यात आला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे हे उमेदवार आहेत. आघाडीचा धर्म पाळून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी सोबत प्रचार करीत आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आहोरात्र मेहनत घेवून,प्रचार करुन काँग्रेसचा विचार व काँग्रेस कार्यकाळात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत.भाजप सरकारच्या काळात देशभरात सुमारे 50,000 हून अधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणुक झाली आहे. दिडपट हमी भावाची घोषणा खोटी ठरली असून नैसर्गिक संकटात सरकारने आर्थिक मदत केली नाही.एकीकडे लोकसभा निवडणुक तर दुसरीकडे दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. परंतु,अनेक गावात पिण्याचे पाणी नाही व जनावरांना चारा नाही. पिकविम्याचे हप्ते भरुन घेतले.परंतु,अद्याप भरपाई दिलीच नाही. त्यामुळे या वेळेस परिवर्तन होणारच व महाआघाडी पुन्हा सत्तेत येणारच असा विश्‍वास व्यक्त करुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार इमाने इतबारे व प्रामाणिकपणे करावा व आघाडीचा धर्म पाळून महाआघाडीचे उमेदवार बजरंगबप्पा सोनवणे यांना विजयी करावी असे आवाहन राजकिशोर मोदी यांना केले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव अ‍ॅड.विष्णुपंत सोळंके, डॉ.राजेश इंगोले, किशोर परदेशी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,हाफीज सिद्दीकी,अकबर पठाण,प्रा.परमेश्वर वाकडे,अॅड.घोगरे,हाजी खालेक कुरेशी यांची समायोचित भाषणे झाली.बैठकीचे सुत्रसंचालन अ‍ॅड. इस्माईल चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अ‍ॅड.अनिल लोमटे यांनी मानले. बैठकीस तालुकाअध्यक्ष औदुंबर मोरे,नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक असिफोद्दीन खतीब, नगरसेवक धम्मा सरवदे,नगरसेवक सुनिल व्यवहारे,राजीव गांधी पंचायतराज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण,माजी नगरसेवक सुनिल वाघाळकर,अशोक जेधे, खालेद चाऊस,गणेश मसने,सज्जन गाठाळ, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित पवार,युवक काँग्रेसचे केज विधानसभा उपाध्यक्ष सचिन जाधव, दिनेश घोडके,रफिक गवळी,अश्‍विन सावंत, शेख जावेद,अमजद पठाण,जावेद गवळी, सुधाकर टेकाळे,अशोक देवकर,शेख मुक्तार, अमोल मिसाळ,भारत जोगदंड,रमेश कदम, शेख महेबुब,रशिद पठाण,प्रविण मस्के, विकास देशमुख, रणजित हारे,शरद मोरे, आजिम जरगर,शेख अनिस,राजकिशोर ढवारे,जुनेद नाना,महेश परदेशी आदींसहित असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.