अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
महाराष्ट्र शासनाकडून बुधवार,दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी निघालेल्या बदली धोरणात अनेक ञुटी असल्याने शिक्षकांच्या बदली धोरणात कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याध्यक्ष अरूणजी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काही बदल,दुरूस्त्या सुचविल्या आहेत.सदरील बदल आणि दुरूस्त्याबाबत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री,ग्रामविकास मंञी,शिक्षण मंञी आणि मुख्य सचिव यांना निवेदन देण्यात येणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याध्यक्ष अरूणजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाकडून बुधवार,दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी निघालेल्या बदली धोरणात अनेक ञुटी असल्याने महासंघाचे वतीने शिक्षकांच्या बदली धोरणात बदल आणि दुरूस्त्या सुचविल्या आहेत.त्या पुढीलप्रमाणे आहेत.१) जिल्हांतर्गत बदली करण्यासाठी ३१ मे ऐवजी ३० जून ही तारीख ग्राह्य धरण्यात यावी.,२) सन २०१८ – २०१९ मध्ये विस्थापित होवून रँडम राऊंड मध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांचा प्रथम प्राधान्याने विचार करून त्यांची योग्य सोय करण्यात यावी.,३) विनंती बदली ही विनाअट करण्यात यावी.,४) आपसी बदली प्रक्रिया ही पुन्हा सुरू करावी. असे बदल व दुरूस्त्यांसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ हा आग्रही आहे.सदरील आशयाचे निवेदन महासंघाचे वतीने लवकरच राज्याचे मा.मुख्यमंत्री,ग्रामविकास मंञी,शिक्षण मंञी आणि मुख्य सचिव यांना निवेदन देण्यात येणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी दिली आहे.