फकिरा ब्रिगेड सामाजिक संघटनेचे उपजिल्हाधिकार्यांना निवेदन
अंबाजोगाई (प्रतिनिधी): मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे याकरिता बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील साळेगाव येथील संजय ज्ञानोबा ताकतोडे (वय 35 वर्षे) या युवकाने पालि येथील बिंदुसरा तलावात जलसमाधी घेतली.मयत संजय हा युवक ताकतोडे कुटुंबाचा आधार होता समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्याने आपले बलीदान दिले.त्यामुळे राज्य सरकारने त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी व मृत्यूस जबाबदार असणार्या सक्षम यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी फकिरा ब्रिगेडच्या वतीने अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी यांना बुधवार,दि.6 मार्च रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,गेली अनेक वर्षापासुन मातंग समाज लोकसंख्येने प्रमाणात स्वतंञ (अ,ब,क,ड प्रमाणे) आरक्षण मिळावे या करिता वेळोवेळी मोर्चे, आंदोलने करीत आहेत. तरीही या प्रश्नी सरकारने दुर्लक्ष करून समाजास वेठीस धरले आहे. मातंग समाजाचा आर्थिक स्रोत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला जाणीवपुर्वक बंद करून समाजातील बेरोजगार तरूणांची कोंडी सरकारने केली आहे.या सर्व बाबींमुळे हाताश होवून बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील साळेगाव येथील संजय ज्ञानोबा ताकतोडे (वय 35 वर्षे) या युवकाने पालि येथील बिंदुसरा तलावात जलसमाधी घेतली व आपली जीवनयात्रा संपवली त्यामुळे शहीद संजयभाऊ ताकतोडे यांच्या मृत्यूस जबाबदार धरून मुख्यमंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सरकारने मातंग समाजाच्या आरक्षणासाठी प्राणाचे बलीदान देणार्या शहीद संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी,शासकीय सेवेत सामावून घ्यावे व मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा या प्रश्नी समस्त मातंग समाज व फकिरा ब्रिगेडच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.सदरील निवेदनावर फकिरा ब्रिगेडचे मराठवाडा संघटक महादेव गव्हाणे,बीड जिल्हाध्यक्ष अविनाश साठे,विधी सल्लागार अॅड.राजकुमार चौरे,तालुकाध्यक्ष विजय धबडगे,तालुका संघटक पांडुरंग गादेकर,
तालुका सचिव संतोष माने,शहराध्यक्ष चंद्रकांत घोडके,केज तालुकाध्यक्ष प्रकाश खंडागळे, अंबाजोगाई शहर उपाध्यक्ष सचिन होके यांच्यासह शिवम साठे,सुजित साठे,ईश्वर काळे, सौरभ चव्हाण, ऋषीकेश पौळ,शंकर साठे,बळीराम कांबळे, शरद कांबळे,विकास तरकसे,गणेश वायदंडे, सतिष खलसे,निसार शेख,सलिम शेख, नितीन होके,दिपक साठे,आकाश जोगदंड, समाधान दोनगहू, अनिल धबडगे,सोनु खलसे,विशाल पाडे, सोमनाथ वायदंडे, नितीन खलसे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.