गावठी दारू हातभट्टीवर धाड
सोयगाव दि.१०(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): उप्पलखेडा (ता.सोयगांव)येथे मंगळवारी (ता. ०९) सोयगाव पोलीसांनी गावठी दारू अड्डय़ावर टाकलेल्या छाप्यात गावठी दारू, पंधरा हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट केले.
रमेश नामदेव सोनवणे (४५)असे आरोपीचे नाव असुन पोलीसांचा सुगावा लागल्याने तो फरार होण्यात यशस्वी झाला त्यांच्या विरोधात बनोटी दुरक्षेत्रात मुंबई दारुबंदी कलम (६५)फ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उप्पलखेडा येथे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करुन विक्री केली जात असल्याची माहीती खबऱ्यातर्फे मिळाल्यानंतर मंगळवारी सोयगाव पोलीसांनी उप्पलखेडा शिवारातील गावठी दारु अड्यावर छापा मारुन गावठी दारू सह तीनशे लिटर रसायन अंदाजे पंधरा हजार रुपये किमंतीचे नष्ट केली.पोलिसांचा सुगावा लागल्याने. आरोपी रमेश सोनवणे पळुन जाण्यात यशस्वी झाला . लोकसभा निवडणुकी निमित्ताने बनोटी परीसरात आर्दश आचार संहितेची कडक अंमलबजावणी केली जात असल्याचे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. सदरील कारवाई वरीष्ठ पोलिस निरीक्षक एम. डी. गुंडीले यांच्या मार्गदर्शनाली पोलिस निरीक्षक शकील शेख, सहपोनि रोडगे, पोलीस नाईक योगेश झाल्टे,सुभाष पवार पो कॅा कौतीक सपकाळ, दिपक पाटील, यांच्या पथकाने केली.