बीड जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यहेल्थ

जय महेश कारखान्याने विषसदृष्य पाणी पाटबंधारे विभागाच्या चारीत सोडल्याने पाणी विहरीत पाझरून आडगावकरांचे आरोग्य धोक्यात – डाॅ.गणेश ढवळे

बीड दि.१६:प्रतिनिधी– माजलगाव तालुक्यातील पवारवाडी स्थित जय महेश साखर कारखान्याने विषसदृष्य पाणी पाटबधारे विभागाच्या चारीमधुन सोडल्यामुळे आडगाव खरात परिसरातील दुषित पाणी झिरपल्यमुळे विहीरीचे पाणी दुषित झाले असून त्यामुळेच आडगावकरांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना त्वचेचे विकार जडले असून संबधित प्रकरणात जबाबदार जय महेश साखर कारखान्याचे व्यावस्थापक तसेच पाटबंधारे विभागाचे संबधित जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन ग्रामस्थांना औषधोपचारासाठी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, सहकार मंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.

आडगाव खरात सरपंच, ग्रामसेवकांची तक्रार परंतु दखल नाही

आडगाव खरात ग्रांमपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी १५ मार्च २०२२ रोजी व्यावस्थापकीय संचालक जय महेश साखर कारखाना यांना लेखी तक्रारीद्वारे कारखान्याच्या दुषित सांडपाण्यामुळे आडगाव खरात ग्रामपंचायतचे पाणी दुषित झाले असून सांडपाण्याची विल्हेवाट लावावी असे म्हटले आहे परंतु अद्याप याविषयी कोणतीही सुधारणा झालेली नसुन दुषित पाणी पाटबंधारे विभागाच्या चारीवाटे सोडण्याचे थांबलेले नाही.

स्वखर्चाने टॅकर सुरू करण्याचा जय महेश साखर कारखान्याला पुळका का?

जय महेश साखर कारखान्याने पाटबंधारे विभागाच्या चारीतुन विषसदृष्य पाणी सोडलेले असुन ते पाणी विहरीत मुरल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो हे गांभीर्य लक्षात घेऊन स्वखर्चाने टॅकर सुरू केले असून ग्रामस्थांना पर्याय नसल्यामुळेच टॅकरचे पाणी वापरावे लागते.

पाटबंधारे विभागाच्या आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी : डाॅ.गणेश ढवळे

पाटबंधारे विभागाच्या चारीतुन विषसदृष्य पाणी सोडण्यात येत असताना याविषयी ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे सांगून सुद्धा पाटबंधारे विभागाचे आधिकारी कोणतीही कारवाई करत नसुन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असुन जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन औषधोपचार करण्यासाठी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Back to top button