पाटोदा (प्रतिनिधी)दि.११: महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपुर्ण देशाच्या सामाजीक, शैक्षणीक, सांस्कृतिक व वैचारीक जडणघणीत क्रांतीकारी वाटा उचलणारे, हजारो वर्षापासुन चालत आलेल्या उपेक्षा,अन्याय, आणि शोषनयुक्त समाजरचनेला बंद करून समाजाला नवी दिशा देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती विविध शासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली तसेच सार्वजनिक विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी यांच्या वतिने महात्मा फुले जयंती निमित्त रांगोळी,निबंध,भाषण स्पर्धा घेण्यात आल्या तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंती निमित्त पंचशिला जावळे यांचा आक्रेस्टा घेण्यात आला तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती निमित्त संत सावता महाराज चौकात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करताना नगरसेवक संदिप जाधव, नगरसेवक विजय जोशी, साप्ताहिक संपादक व पञकार संघाचे अध्यक्ष गणेश शेवाळे,सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामेश्वर गोरे,डॉ.रविद्र गोरे,संजय गोरे,सुशिल ढोले,पिटु गोरे, हरिभाऊ राऊत,भरत नाईकनवरे,दिक्षीत मामा,अमोल गोरे,अजय जोशी,सतिष गोरे,शरद नाईकनवरे आदी फुले प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.