बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जयंतीनिमित्त महात्मा फुले यांना अभिवादन
अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.१२: बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन केले. शहरातील सहकार भवन येथे गुरुवार, दिनांक 11 एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी बोलताना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोदी यांनी सांगितले की,महात्मा फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला.ज्या काळात स्ञियांवर अनेक बंधने होती.त्याकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिकवले व शिक्षिका बनविले. बहूजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचविले. समाजाला तर्क मांडायला शिकवले. वैज्ञानिक दृष्टीकोन सांगीतला.बहुजन समाजासाठी घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून दिला. यासोबतच शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे विविध प्रश्न त्यांनी तत्कालीन इंग्रज सरकार समोर मांडले व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठविला. महात्मा फुले हे थोर क्रांतीकारक व समाजसुधारक होते. तत्कालीन प्रस्थापीत व्यवस्थेविरुद्ध महात्मा फुले यांनी मोठा लढा उभारला.साहीत्य लिहीले.समाजातील अस्पृश्य व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका प्राधान्याने महात्मा फुले यांनी घेतली व समाज सुधारणेची लोकचळवळ उभी केली.कारण,म.फुले हे त्याकाळी समाज परीवर्तनाचे केंद्रबिंदू होते असे मोदी यांनी सांगितले.याप्रसंगी बोलताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अंबाजोगाईचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने यांनी यावेळी बोलताना महात्मा फुले यांचे विविध क्षेत्रातील कार्या विषयीची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव गांधी पंचायत राज संघटनचे राणा चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक गणेश मसने यांनी मानले.
प्रारंभी आता फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, अंबाजोगाई शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक वाजेद खतीब,माजी नगरसेवक गणेश मसने,
राजीव गांधी पंचायत राज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण,युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष रणजित पवार,दिनेश घोडके, शेख खलील,केज विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन जाधव,अमोल मिसाळ,भारत जोगदंड सर्व कार्यकर्त्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.