आमचा विरोध केन्द्र सरकारला नसुन सरकारने अवलंबवील्या धोरणाच्या विरोधात आहे कॉ.सुधीर मुंडे केन्द्रीय कार्यकारीणी सदस्य महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी वर्कर्स फेडरेशन सघंटना
परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― विज ऊधोगाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असुन सुधारित विद्युत विधयक -२०२० आणून वीज क्षेत्र खाजगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन,आॕल इंडिया फेडरेशन आॕफ इलेक्ट्रिसिटी एम्पलाॕईज व राज्यातील आणी देशातील नॕशनल को-अॉर्डीनेशन कमिटी अॉफ इलेक्ट्रिसिटी एम्पलाॕईज अॕड इंजिनियरर्स यानी सुधारित विघुत विधयकाच्या प्रारुपास एक जुन रोजी देशात व राज्यात १५ लाख विज कर्मचारी व अभियंते यांनी काळया फीती लावुन जोरदार निदर्शने करून विरोध केला असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसीटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे केन्द्रीय कार्यकारीणी सदस्य कॉ.सुधीर मुडे यानी दिली केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सुधारित विद्युत कायदा-२०२० आणुन विद्युत क्षेत्र हे खाजगी भाडंवलदारासाठी खुले करण्याचा निर्णय घेतल्याचा दिसुन येत आहे केंद्र सरकारच्या या सुधारित विध यकास आज देशातील १५ लाख कर्मचारी व अभियंते यानी निदर्शने केली या निषेध अंदोलनात इतर २७ सघटनानी सहभाग घेवुन सुधारीत विघुत कायघास विरोध दर्शवीला आहे
सदरचा सुधारित विघुत कायद्या येणाऱ्या अधिवेशनात पास झाल्यास त्याचे पुरोगामी परिणाम कर्मचारी व अभियंते यांच्या सह शेतकरी,सामान्य ग्राहक,गरीब नागरीक मोठ्या प्रमाणावर भरडला जाणार आहे.पुर्वीच्याच विघुत मडंळाचे विभाजन होवुन कंपनी करण झाल्यामुळे विज उधोग आदीच तोटयात आला आहे विज क्षेत्रात देशात काम करणारे १५ लाख कामगार व अभियंते यांच्या नौकऱ्या राहीतील की जातील असा प्रश्न कर्मचारी याच्या समोर निर्माण झाला आहे प्रस्तावीक सुधारीत विधयकामुळे सरकारी वीज निर्मिती,पारेषण व वितरण करणाऱ्या कंपन्याचा तोटा वाढत जाऊन विज कंपन्या बंद होतील विजेच्या दरावर सरकारचे कठलेही नियंत्रण सुध्दा राहणार नाही शेतकरी,गरीब,छोटे उधोजक,वाणिज्य वीज ग्राहक याना कुठलेही सबसीडी मिळणार नाही त्यामुळे मिळणारी माहगडी विज कोणीही वापरु शकणार नाही विज क्षेत्राचे खाजगीकरण झाल्यास सुक्षित बेरोजगाराणा नौकरी व विज कर्मचारी याचे प्रमोशन मधील असलेले आरक्षण सुदधा बंद होईल.या निषेध अंदोलणा मध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशनचे परळी झोनचे अध्यक्ष कॉ श्रीगणेश मुंडे यांच्यासह झोन कार्याध्यक्ष कॉ अशोक मुंडे, झोन उपाध्यक्ष कॉ बालासाहेब गर्जे, कॉ ऋषिकेश मुंडे, झोन सचिव कॉ संदीप पाटील, झोन सहसचिव कॉ सोमेश्वर कस्तुरे, झोन कोषाध्यक्ष कॉ वसंतराव बारकुले, झोन सल्लगर कॉ संदिप काळे, शाखा अध्यक्ष कॉ अविनाश जाधव, शाखा उपाध्यक्ष कॉ राहुल जाधव, शाखा उपाध्यक्ष कॉ रमाकांत शिंदे, शाखा सचिव कॉ प्रकाश बोबंले, शाखा सहसचिव कॉ विजय गुट्टे, शाखा संघटक कॉ प्रदीप फड, शाखा सदस्य कॉ आबासाहेब गायकवाड, कॉ संजय मुंडे, कॉ कृष्णा मुंडे, शाखा अध्यक्ष कॉ मुंजा सोनवणे, शाखा उपाध्यक्ष कॉ सचिन शिंदे, शाखा उपाध्यक्ष कॉ सायस मुंडे, शाखा सचिव कॉ जनार्धन बोंबले, शाखा सदस्य कॉ मदन बिडगर,कॉ मिलींद क्षीरसागर, कॉ लक्ष्मीताई वाडकर, कॉ पूजाताई राठोड, कॉ सविताताई कदम,कॉ ज्योतीताई फड, कॉ जयश्रीताई फाटक, सर्व झोनल कार्यकारणी व सर्कल कार्यकारणी सर्व पदाधिकारी यांच्या सह सर्व सभासद सहभाग घेवुन शासणाच्या आदेशा नुसार सोशल डिस्टस पाळुन व मास्क घालुन काळया फिती लावुन निषेध व्यक्त करणार आला.