पाटोदा(प्रतिनिधी): दिनांक 6 फेब्रुवारी 2019 वार बुधवार या दिवशी सकल मराठा समाज तालुकास्तरीय बैठक मौजे तांबा राजुरी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे संपन्न झाली. बैठकीची सुरुवात स्वराज्यसंकल्पिका माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने व जिजाऊ वंदना ने सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित सर्व सकल मराठा समाजाचे शाब्दिक असे स्वागत हरिदास तांबे सर यांनी केले .बैठकीचे प्रास्ताविक अंकुश तांबे सर यांनी केले. मराठा भूषण आरक्षणाचे गाढे अभ्यासक प्रा शिवश्री बाळासाहेब सराटे यांनी फोनद्वारे बैठकीला संबोधित करण्यात आले. त्यामध्ये सरांनी असे सांगितले की आज कोर्टामध्ये युक्तिवाद झाला .या युक्तिवाद मध्ये मराठा आरक्षणाचे विरोधक अॅड.सदावर्ते महाशयांनी विरोधक म्हणून भूमिका मांडली परंतु पुराव्याअभावी योग्य ती भूमिका त्यांना मांडता आली नाही आणि एवढा काय प्रभाव त्यांच्या युक्तिवादाचा झालेला दिसून आला नाही.तसेच ओबीसी आरक्षणाचे विरोधकांनी आणे सदावर्ते हरी नरके व खासकरून ब्राह्मण समाजातील वकील मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. आरक्षणाच्या विरोधकांनी एक युक्तिवाद करण्यासाठी पाच लाख रुपये घेणारे वकील लावले आहेत. मराठा समाजाच्या वतीने सरकारने काही वकील लावली आहेत तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुराव्यासहित काही मुद्दे, ड्राफ्ट माहिती वकिलांना पुरवण्यात आली आहे. आणखी पुढील दोन दिवस हा युक्तिवाद न्यायालयामध्ये चालणार आहे. तसेच आदरणीय सरांनी सराटे सरांनी एक मुद्दा अधोरेखित केला की मराठा समाजाचे विरोधक माॅसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करताना दिसत नाहीत सरांनी असे सांगितले की आता मराठा समाजाने आपापसातील भांडणे हेवेदावे गट-तट राजकीय वैर बाजूला ठेवून समाजाच्या न्यायालयीन लढ्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. अशाप्रकारे सरांनी या तांबा राजुरी येथील बैठकीला मार्गदर्शन केले त्यानंतर बऱ्याच सकल मराठा समाजाच्या बांधवांनी आपली मनोगते व्यक्त केली व त्यामध्ये समाजाला तन-मन-धनाने सहकार्य करण्यासाठी शब्द दिला. बऱ्याच वक्त्यांनी एकीचे बळ काय आहे मराठा समाजाच्या मदतीने महाराष्ट्रातील कुठलीही समस्या आपण कशाप्रकारे सोडू शकतो याची विविध उदाहरणे देऊन एकीचे बळ याचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी बैठकीला मार्गदर्शन करताना समाजातील बांधवांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे व्यवसाया मध्ये एकमेकांना मदत केली पाहिजे त्याचबरोबर आपले आरोग्य जोपासले पाहिजे यावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीला गणेश कवडे, भीमराव सरोदे सर बाळासाहेब शिंदे सर, विजय तांबे सर, सचिन पवार सर, गजानन बेद्रे सर, या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वांनी समाजाच्या हितासाठी एकत्र येण्याची शपथ घेतली या बैठकीमध्ये समाजाच्या न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे सदर बैठकीला तालुक्यातील घुमरा पारगाव मुगाव सौताडा सुपा सावरगाव कुसळंब अंमळनेर पिंपळवंडी डोंगर किनी उंबरविहिरा तळे पिंपळगाव वाघाचावाडा पाटोदा चुंबळी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव उपस्थित होते व शेवटी दीपक तांबे यांनी सर्वांचे शाब्दिक आभार मानले व समाजाची ही तालुकास्तरीय बैठक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपली असे जाहीर करण्यात आले.
0