औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव तालुक्यात उष्णतेची लाट ; पारा ४२ अंशावर,जनजीवन विस्कळीत

सोयगाव दि.१४(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):सोयगावसह तालुकाभर शनिवारी उष्णतेची लाट पसरल्याने आठवडाभरातील पहिली उन्हाची दाहकता शनिवारी सोयगावकरांना जाणवल्याने शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते,दरम्यान सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाच्या तीव्रतेने शहरवासी पोळले होते.
शहरासह तालुक्यात वाढत्या उष्णतेच्या झळांनी तालुक्यातील नागरिक उकाड्याने असह्य झाल्याने,ग्रामीण भागात झाडाखाली घराबाहेर चारपायी टाकून वृद्धांनी उन्हाच्या झळांपासून संरक्षण केले.दरम्यान हवेतील दाब कमी झाल्याने वृद्धांचा दम घुटमळत होता.त्यामुळे काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले,दरम्यान उन्हापासून संरक्षणासाठी अनेकांनी थंड ठिकाणाचा विसावा पसंद केला,शेतावर झाडाखाली कुटुंबासह अनेकांनी मोकळ्या हवेत राहणे पसंद केल्याचे चित्र ग्रामीण भागात आढळून आले,आठवडाभरापासून अति उष्णतेच्या झळा सहन करणाऱ्या सोयगावकरांना शनिवारी कमालीच्या तापमानात उन्हाचे चटके सहन करण्याची वेळ आली होती.

शहरात शुकशुकाट

वाढत्या उन्हाच्या झळांनी शहरात ऐन निवडणुकांच्या काळात स्मशान शांतता पसरली होती.निवडणूक प्रचार तापण्याऐवजी उन्हाच्या झळांनी थंडावला होता,सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाच्या झळा शहरवासीयांना सहन कराव्या लागल्या.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.