परळी : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे एका मोकळ्या मैदानात जमिनीखालून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर पडतो आहे. त्यामुळे या परिसरासह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. बीडमधील परळी तालुक्यातील सिरसाळा गावाच्या येथील एका मोकळ्या मैदानावर असा प्रकार पहायला मिळत आहे. यासंदर्भातले व्हिडीओ देखील व्हाट्सअप्पसह सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा सगळा प्रकार नक्की काय आहे हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमत आहे.
या भागात काल सायंकाळी पाऊसाच्यावेळी विजेची तार पडून हा सगळा प्रकार झाला असल्याचे संगितले जात आहे परंतु असे असले तरी याठिकाणी जमिनीतून येणारा पदार्थ पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. आता हा नेमका प्रकार काय आहे याची उलगड पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.