बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

विनायक मेटे यांना पुन्हा जोरदार धक्का ; शिवसंग्रामचे बालाजी पवार,किशोर कांकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

परळी दि.१४: बीडचे विनायक मेटे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून शिवसंग्रामचे बालाजी पवार आणि किशोर कांकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी देत आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. कार्यकर्त्यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा देत भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.सर्व कार्यकर्त्यांचे पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    मेटेंच्या वागणुकीला कंटाळलेल्या कार्यकर्ते पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करीत आहेत. आज रविवारी शिवसंग्रामचे खंदे समर्थक बालाजी पवार, किशोर कांकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष लाला पाटील चौरे (खंडाळा), अॅड. दीपक गायकवाड (जेबा पिंपरी), बबनराव कोकाटे (मांजरसुंबा), पिंपळगाव घाटचे माजी सरपंच रमाकांत तेलंग, राजाभाऊ कारगुडे (पाली) आदी कार्यकर्त्यांनी आज यशश्री निवासस्थानी भाजपात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत करून सन्मानाची वागणूक देण्याची ग्वाही दिली.
    दरम्यान जिल्ह्याला अभ्यासू आणि जनतेच्या विकासाची तळमळ असणाऱ्या खासदाराची आवश्यकता असुन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी सतत जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला असल्याने या निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.