पाटोदा (शेख महेशर): शिरुर (कासार) तालुक्यातील जाटनांदुर येथे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत मोती साहेब दर्गाह यांचा संदल व उरुस (जत्रा) उत्साहाने साजरा करण्यात आला.
या संदलाचे आयोजन दर्गा मोती साहेब ट्रस्ट कमेटी च्या मार्फत केले जाते. ट्रस्टचे अध्यक्ष समीर शेख (राजुभाई) पत्रकार यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे स्वागत केले, व मौलाना सईद सहाब यांनी “फतेहा” (दुआ)चे पठण केले. जाटनांदुर ता.शिरुर(कासार) या
गावातील दर्गा हजरत मोती साहेब यांच्या संदल निमित्त मिरवणूक काढण्यात आली.
गावातील लोकांना लंगर (महाप्रसाद) देण्यात आला.
प्रती वर्षी उरुसाचे आयोजन करण्यात येते ताजी उरुसा च्या दिवशी नवस फेडले जातात व दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे आयोजन केले जाते. नामवंत पैलवान या मध्ये सहभाग घेतात. दुष्काळी परिस्थिती असल्याने भाविकांना पिण्याचे गार पाण्याचे नियोजन व व्यवस्था श्री. राहुल चव्हाण व श्री. गणेश डोंगर यांनी केले होते. या वेळी खासदार प्रितमताई मुंडे, आष्टी /पाटोदा /शिरुर विधानसभा आमदार श्री. भिमरावजी धोंडे, जिल्हा परिषद सदस्य पती श्री. रामदास बडे, पंचायत समितीचे सभापती श्री. सुनिल चौधरी, जाटनांदुर गावचे सरपंच श्री. हनुमान डोंगर, ग्राम पंचायत सदस्य श्री. ससाने, श्री. रंगनाथ सोंडगे, श्री. तबाजी इंगळे, जनाब अली हजरत शेख, गनी मौलाना, रज्जाक शेख, आमिन शेख, निसार शेख, रम्मु शेख, मौलाना सईद, सिराज शेख, बशिर शेख, मंहमद शेख, आसिफ शेख,जाकीर, रिजवान शेख इत्यादी सह परिसरातील भाविक भक्त व नागरीक उपस्थित होते.