बीड जिल्हाराजकारण

बीड जिल्हयातील गोर गरीबांच्या आरोग्याला 'नव संजीवनी' देणाऱ्या डाॅक्टर प्रितमताई

महाआरोग्य शिबिरातून लाखो रुग्णांवर उपचार तर ‘स्वाराती’ रुग्णालयासाठी कोट्यावधींचा निधी

बीड दि.१५: बालघाटच्या डोंगररांगात असलेल्या बीड जिल्ह्यातील शेकडो वाडी तांडे डोंगरदऱ्यात वसलेले आहेत. या भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचणे सहज शक्य नसते. शस्त्रक्रीया किंवा औषधोपचाराचा खर्चदेखील मोठा असल्याने बऱ्याचदा आजार अंगावर काढला जातो आणि रुग्णाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या खा. प्रीतमताई मुंडेंच्या लक्षात ही बाब आली नसती तर नवलच.. त्यामुळेच सत्तेत आल्यानंतर त्यांनी दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे धोरण आखले. यातूनच मागील साडेचार वर्षांच्या काळात त्यांनी बीड जिल्ह्यात अनेकदा महाआरोग्य शिबिरे घेतली. या आरोग्य शिबिरांचा जिल्ह्यातील लाखो रुग्णांना फायदा झाला. स्वतः एम.डी. असलेल्या खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी अनेक रुग्णांची तपासणी केली. या लाखो गरीब रुग्णांच्या आशीर्वादाच्या जोरावर प्रीतमताईंचा विजय सुकर झालेला आहे.

खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, परळी तालुक्यात गोपीनाथगड येथे ही महा शिबिरे घेण्यात आली. दुर्गम भागातील लोकांना शिबीर स्थळापर्यंत आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. एकही रुग्ण शिबिरापासून वंचित राहू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. शिबिरात रूग्णांसाठीच्या विविध स्टाॅल्समधून कॅन्सर, किडनी यासह ५० हून अधिक रोगांच्या तपासण्या डाॅक्टरांनी केल्या. सोनोग्राफी, इसीजी, रक्त, लघवी तपासणी, औषधी वाटप याबरोबरच शेतक-यांना आत्महत्ये पासून परावृत्त करण्याबाबत मार्गदर्शन तसेच तंबाखू व्यसनमुक्ती नियंत्रण, एड्स, मलेरिया, क्षयरोग याविषयी जनजागृती, किशोरवयीन मुला मुलींना मार्गदर्शन, महात्मा फुले जीवनदायी योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेविषयी रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. एवढेच नव्हे तर जयपूर फुट व अपंगाना विविध साहित्याचे वितरणही शिबिरातून करण्यात आले. रूग्णांसाठीच्या विविध स्टाॅल्समधून कॅन्सर, किडनी यासह ५० हून अधिक रोगांच्या तपासण्या डाॅक्टरांनी केल्या. सोनोग्राफी, इसीजी, रक्त, लघवी तपासणी, औषधी वाटप याबरोबरच शेतक-यांना आत्महत्ये पासून परावृत्त करण्याबाबत मार्गदर्शन तसेच तंबाखू व्यसनमुक्ती नियंत्रण, एड्स, मलेरिया, क्षयरोग याविषयी जनजागृती, किशोरवयीन मुला मुलींना मार्गदर्शन, महात्मा फुले जीवनदायी योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेविषयी रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. रोगनिदाना सोबतच मोठ्या शहरातील नामांकित तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांवर तातडीचे शस्त्रक्रियादेखील पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. जनरल सर्जरी, मोतीबिंदु, स्त्रीरोग आदी विविध एकूण २५ हजार शस्त्रक्रिया या आरोग्य यज्ञात करण्यात आल्या. या मोठ्या शिबिरांव्यतिरिक्त दरमहा नियमितपणे होत असलेल्या छोट्या शिबिरातून गरीब रुग्णांवर पुणे आणि मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. खा. प्रीतमताई मुंडे यांनी सुरू केलेल्या आरोग्य यज्ञाचा दुष्काळात सापडलेल्या गोरगरीब रूग्णांना ख-या अर्थाने फायदा झाला. आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांना आजारांवर उपचार घेणे शक्य नव्हते ते या शिबीरामुळे शक्य झाले. शिबीरात रूग्णांची केवळ तपासणीच नव्हे तर औषधोपचार आणि शस्त्रक्रियाही मोफत उपलब्ध झाल्याने गोरगरीब रूग्णांचे आशीर्वाद खा. प्रीतमताई यांच्या पाठीशी आहेत.

खा.डाॅ.प्रितमताई मुंडेंनी स्वतः तपासले रुग्ण

खासदार डाॅ प्रितमताई मुंडे हया स्वतः त्वचारोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून या शिबीराचे उत्कृष्ट नियोजन तर केलेच शिवाय डाॅक्टर म्हणून स्वतः दोन्ही दिवस इतर डाॅक्टरांच्या बरोबरीने शिबीरात बसून रूग्णांच्या तपासण्या केल्या. डाॅक्टर व खासदार अशा दोन्ही भुमिका अगदी सहजपणे पार पाडत अत्यांनी रुग्नानांची मने जिंकली होती.

स्वाराती रुग्णालयास कोट्यवधींचा निधी

अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय हे बीडसह आजूबाजूंच्या जिल्ह्याची प्रमुख जीवनवाहिनी आहे. दररोज किमान २ हजार रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येतात. या रुग्णालयातून गरीब रुग्णांना अद्यावत उपचार देण्यासाठी प्रीतमताईंनी अक्षरशः निधीचा पाऊस पाडला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्राने दिलेला एमआरआय मशीनसाठी साडेनऊ कोटींचा निधी राज्याकडे जमा झाला आहे. ३३ कोटींचा बह्य्रुग्ना विभाग आणि २२ कोटींच्या मुलांच्या वसतिगृहाचे काम प्रगतीपथावर आहे. ११ कोटींचे मुलींचे वसतिगृह निविदास्तरावर आहे. मणक्याच्या शस्त्रक्रिया, युरोसर्जरी, सीव्हीटीएस या सारख्या शस्त्रक्रिया देखील आता इथेच पार पडत आहेत. स्तनांच्या कर्करोगाचे अचूक निदान करण्यासाठी दिड कोटी रुपयांची डिजिटल मेमोग्राफी मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्याधुनिक आणि परिपूर्ण शवगृहासाठी ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गोव्याच्या धर्तीवर हे शवगृह उभारण्यात येणार आहे. रुग्णांच्या नातेवाईकासाठी निवारा कक्षही तयार करण्यात आला आहे. या रुग्णालयात कॅथल्याब आणण्यासाठीही तसेच वर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. स्वतः डॉक्टर असलेल्या प्रीतमताई या सर्वात मोठ्या ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजावर नियमितपणे लक्ष ठेऊन असतात. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयात अनेक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. नुकतेच या महाविद्यालयाच्या १०० जागा कमी करण्याच्या निर्णय देखील प्रीतमताईंनी आरोग्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून मागे घ्यायला लावला. प्रीतमताईंनी त्यांच्या काळात स्वारातीचा चेहरामोहरा बदलण्यात दिलेल्या योगदानाचे दूरगामी सकारात्मक परिणाम गरीब रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर पडणार आहेत. एखादे उच्चशिक्षित नेतृत्व समाजाच्या किती फायद्याचे ठरू शकते याचे प्रीतमताई एक योग्य उदाहरण आहेत.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.