ना.पंकजाताई मुंडेंच नेतृत्व बळकट करा; डॉ. प्रितमताई यांना पुन्हा दिल्ली पाठवा
बीड दि.१५: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकारणासाठी धनगर समाजाचा उपयोग करून घेतला मात्र आरक्षण देण्याची भाषा कधीच करत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या कल्याणासाठी अनेक सवलती सुरू केल्या असुन भाजप-सेना युतीचे सरकारच आरक्षण मिळवुन देईल. बीड जिल्ह्याच्या भाग्यासाठी ना.पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व फायद्याचे असुन ते जपणं आपलं काम आहे. जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेने उद्याच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन धनगर समाजाचे नेते पद्मश्री खा.डॉ. विकास महात्मे यांनी केले.
महायुतीच्या उमेदवार प्रितमताई यांच्या निवडणूक प्रचारासाठी हिवरा पहाडी, ता. बीड येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात स्व. गोपीनाथराव मुंडेंनी वंचित, उपेक्षित वर्गातील लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांचा वारसा मुंडे भगिनी सक्षमपणे चालवताना अवघ्या पाच वर्षात बीड जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत शिखरावर नेऊन ठेवला. प्रितमताई मुंडें यांच्यामुळे रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गाचे जिल्ह्यात जाळे पसरले. हे नेतृत्व जपणे हे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात युती सरकारने राजकारणी लोकांची दलाली बंद करून हे सरकार गोरगरीबांसाठी चालवले. ओबीसी कमिशनची स्थापना करून त्याला घटनात्मक दर्जा दिला, भटक्या विमुक्त्यांसाठी केेंद्रात महामंडळ चालू केले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ हे नाव दिले, विद्यार्थ्यांना सवलती, मुलींच्यासाठी वस्तीगृह, अहिल्यादेवी विकास महामंडळ, समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेत असुन केेंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविल्याचे महात्मे म्हणाले. आम्ही अनेक वर्षापासून राजकारणात काम करतो मात्र आपल्या शत्रुला धडा दाखवणारा एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही पाहिला. पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला त्यांनी केला ज्यामुळे आपला स्वाभिमान जागा होऊन शत्रुला जागा दाखवुन दिली. मोदी हे सक्षम नेतृत्व भारताच्या हितासाठी महत्वाचं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील समाज बांधवांनी डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांना प्रचंड मताने विजयी करावे. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या भविष्यासाठी मुंडे भगिनीच महत्वाच्या आहेत. जिल्ह्याचा चांगला विकास त्यांनी केला त्यामुळे कोणाचं ऐकु नका, ना कुणाच्या बोलण्यावर जाऊ नका, फक्त म्हणजे फक्त प्रितमताई यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर बाबुराव ढोरमारे, शांतीनाथ डोरले, रवि खेडकर, संजय लकडे, सरपंच अशोक शिंदे, नितीन शिंदे व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.