सोयगाव तालुका

सोयगाव: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती उत्साहात

सोयगाव(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त शहरातील पूर्णाकृती पुतळ्यासमोर रविवारी (दि.१५) नवतरुण बौध्द मित्र मंडळ व बौद्ध उपसकांनी सामूहिक बौध्द वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    विविध पक्ष संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.नगर पंचायतीच्या वतीने अध्यक्षा प्रतिभा बोडखे, पोलीस स्टेशन च्या वतीने पोलीस निरीक्षक माधव गुंडीले, तहसील कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,वनक्षेत्रपाल राहुल सपकाळ,मराठा प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हा अध्यक्ष विजय काळे,सुनील काळे,प्रमोद वाघ ,ज्ञानेश्वर जुनघरे , पूनम।परदेशी, शेख गुलाब, शेख सुलेमान, विजय पगारे, म. राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने भरत पगारे,माजी नगराध्यक्ष कैलास काळे, नगरसेवक वंदना बनकर, आदींनी पुष्पहार घालून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी उस्थितीत नगरसेविका मनीषा चौधरी, स्वनिल चौधरी, कृष्णा जुनघरे पाटील, वसंत बनकर, अस्मिता जमधडे,मिलिंद पगारे व पंकज पगारे यांनीं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या।जीवन।चरित्रावर दैदिप्यमान प्रकाश टाकला तसेच तमाम महिला,नागरिकांसह युवकांनी डॉ.आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून अंधारातून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार वसंत पगारे यांनी मानले. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची सवाद्य शहरभर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात ।मिरवणूक काढण्यात आली.ही मिरवणूक वाल्मीक चौक, नारलीबाग, छत्रपती शिवाजी चौक, एस. टी. बसस्थानक, राममंदिर -पोलीस स्टेशन मार्गे भवाणीपुरा व पुन्हा डॉ. आंबेडकर चौक येथे पुतळ्यास पुष्पहार घालून विसर्जीत करण्यात आली.घोसला येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सरपंच प्रकाश पाटील व मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष सोपान दादा गव्हाडे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.