अकोट: अकोट तालुक्यातील ग्राम रामापुर येथील पंकज मधुकर शिरसाम वय २६ वर्ष धंदा मजुरी याने गावाला लागूनच असलेल्या विजय गोपालदास चांडक यांच्या शेतातील १५० फुट असलेल्या कोरड्या विहीरी मधे आत्महत्या केली आहे.त्याच्या मागे पत्नी,३ भाऊ, वडिल असा मोठा परिवार आहे.या विहीरी मधे याआधी सुद्धा ३ आत्महत्या झाल्या आहेत.आणि याच विहिरच्या बाजुला अवैध कनेक्शन सुरु असलेल्या ईलेकट्रिक पोलच्या ताणाला रामापुर येथील एक युवक शौक लागून मरण पावलेला आहे. तरी ही विहिर पुर्ण पणे शिकस्थ झाली आहे.तरी शेत मालकाने हे विहिर त्वरित बुजवून टाकावी,किवा त्या विहीरी वर जाळी बसवावी अशी मागणी रामापुर येथील नागरिकानी केलेली आहे.