औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

आचारसंहिता पथकांची सोयगावात संशयास्पद कारवाई ; रात्री भरारी पथक फिरकत नसल्याचा मतदारांचा आरोप

सोयगाव दि.१७(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदार संघाला जोडलेल्या सोयगाव तालुक्यातील १०३ मतदान केंद्रांसाठी आचारसंहितेचे सहा पथके तैनात करण्यात आली असून २४ तास या पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना असल्याने आठ तासाच्या तीन शिफ्टमध्ये ही पथके तालुक्यात सक्रीय झाली आहे.परंतु या पथकांच्या सलग पंधरा दिवसांच्या कारवाईमध्ये अहवाल निरंकच असल्याने आचारसंहिता पथकांच्या कारवाईवर संशयाचे जाळे निर्माण झाले आहे.
लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीने वेग घेतला असतांना सोयगाव तालुक्यातील आचारसंहितेच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या बैठे आणि भरारी पथकांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहे,परंतु या दोन्हीही पथकांच्या कारवाई अहवाल निरंकच मिळत असल्याने त्यांच्या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.भरारी पथकांच्या रात्रीच्या गस्ती कमी झाल्याने रात्री अकरानंतर आचारसंहितेचे भरारी पथके गायब होत असल्याने ही पथके केवळ शोभेच्या वस्तू बनल्या असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.दरम्यान वाहनांची तपासणी करतांना आचारसंहितेचे पथके आढळत नसल्याने सोयगाव तालुक्यात अनोळखी वाहने सुसाट धावत आहे.आचारसंहिता रात्रीच्या गस्ती बंद झाल्याने या पथकांनीच आदर्श आचारसंहिता धाब्यावर बसविली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.