सोयगाव,ता.१८(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):शहराचे ग्रामदैवत असलेल्या व नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून मराठवाड्याभर ओळख असलेल्या भैरवनाथ महाराज चैत्रपोर्णिमा यात्रोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.शहरापासून जवळच असलेल्या भैरवनाथ महाराज संस्थानचे प्रशस्त मंदिर आहे.यात्रेची अंतिम तयारी संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून मराठवाड्यात ओळख असलेल्या भैरवनाथ महाराज यात्रोत्सवात कबुल केलेला नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने भक्त निवासात येणाऱ्या भक्तांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या ठिकाणी दुष्काळात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी नवस कबूल केलेल्यांच्या हाताने बारा गाड्यांचा नवस फेडण्याची प्रथा आहे.बारा गाड्यां ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते,संस्थानचे अध्यक्ष दिलीप बिर्ला,भागवत गव्हांडे,रवी काळे,राजेंद्र अहिरे,समाधान काळे,सुधीर पठाडे,रतन परदेशी,आदि संस्थांचे पदाधिकारी पुढाकार घेत आहे.
“नवसाला पावणारा भैरवनाथ यात्रोत्सव उत्सवात डाळबट्टीने नवस फेडण्याची प्रथा आहे.त्यामुळे भैरवनाथ यात्रोत्सवात मंदिर प्रांगणात डाळबट्टीच्या प्रसादाची मोठी चंगळ होणार आहे.नवस कबूल केलेल्यांची नातेवाईक,सगेसोयरे,आणि परिसरातील मित्र कंपनी या यात्रेत डाळबट्टीच्या जेवणात आमंत्रित केल्या जातात.”