बीड जिल्हाविशेष बातमीसामाजिक

लिंबागणेश ग्रामपंचायत वर कारवाईचा इशारा देताच पोलिस चौकीला शौचालय मिळाले―डाॅ.गणेश ढवळे

बीड:आठवडा विशेष टीम―लिंबागणेश येथिल पोलिस चौकीला ६ कर्मचारी आहेत. चौकीला जागा ग्रामपंचायतने भाडेतत्त्वावर दिली आहे.परंतु शौचालय , पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नव्हते.
याविषयी मी दि.२६ जानेवारी २०२० रोजी सुचक म्हणुन व गणेश लिंबेकर अनुमोदक म्हणुन ठराव क्र.१० घेतला.ज्यात पोलिस चौकीला शौचालय तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे आणि नविन ईमारती साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.सरपंच सौ.निकीता स्वप्निल गलधर आणि गामविस्तार अधिकारी तेलप यांनी सवेसंमत्तीने ठराव मंजूर करण्यात आला.
याविषयी दि.१७/ ०२/ २०२० रोजी या.हष पोतदार साहेब पोलिस अधीक्षक बीड यांना निवेदन दिले.त्यानंतर दि.२६ /०२/२०२० रोजी मुख्यमंत्री ‘; पालकमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन दिले. त्यानंतर दि. १४/०३/२०२० रोजी तहसीलदार आंबेकर व सचिन पुंडगे सहायक पोलिस निरीक्षक नेकनुर ठाणे यांना निवेदन देऊन सरपंच , ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.त्यानंतर आज दि. १५/०३/२०२० रोजी ग्रामपंचायतने पोलिस चौकीला शौचालय उपलब्ध करून दिले.

Back to top button