सोयगाव दि.१८(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): अहिंसेचे पुजारी, पंचशील गुणांची शिकवण देणारे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती बनोटी (ता.सोयगाव) येथे धार्मिक कार्यक्रमासह शोभायात्रा काढुन बुधवारी (दि.१७ )उत्साहात साजरी करण्यात आली.
सकल जैन समाजाच्या वतीने जैन बांधव एकत्र येऊन दरवर्षी भगवान महावीरांची जयंती भक्तीभावाने व उत्साहात साजरी करतात. बोलेरो गाडीवर भगवान महावीर यांची प्रतिमा सजावट करुन सकाळी ७ वाजता जेष्ठ नागरिक मिश्रिलाल जैन यांच्या घरासमोर सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीरांची प्रतिमेचे शोभायात्रा काढण्यात आली़. अहिंसा, पाणी वाचवा, बेटी बचाओ चा संदेश देत मानव आहार शाकाहार, जियो और जीने दो चा नारा देत, बॅन्ड पथकात भक्ती गीत म्हणत, धर्मध्वज घेऊन जैन स्त्री-पुरूष, अबाल-वृध्द पारंपरिक वेशात सहभागी झाले होते़. शोभायात्रा राममंदिरापासुन, बसस्थानक परीसर, शिवनगर, इंदिरानगर, शिवाजी चौक भागातून मुकेश जैन यांच्या घरी विसर्जित झाली. यावेळी पारस जैन, विजय बोहरा यांच्याकडुन पाणी, सरबत वाटप करुन महाप्रसाद देण्यात आला यावेळी मिश्रिलाल जैन, रमेश लाल जैन, सुनिल जैन, राजेश जैन, योगेश जैन, धनराज सोनवणे, मुरलीधर वेहळे, धनलाल चौधरी, प्रदिप सोनवणे, अंकुश धोंडकर, शेख रशिद, कैलास खैरनार आदींसह वरठाण, किन्ही, हनुमंतखेडा येथील जैन बांधव सहभागी झाले होते़ शोभायात्रेत सहभागी झाले होते.