पाटोदा (शेख महेशर): बीड येथे अन्विता हॉटेल या ठिकाणी माणुसकीची भिंतचे संयोजक दत्ता देशमाने यांना सेवा गौरव पुरस्कार रोटरी क्लबचे प्रांतपाल विष्णू मोंढे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या वेळी रोटरी चे बीड चे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, उपप्रांतपाल राहुल कुलकर्णी, सचिव डॉ. सुहास जोशी, प्रो.चेअरमन प्रमोद निनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पाटोदा या ठिकाणी दत्ता देशमाने यांनी आता पर्यंत गरजू गरीब विद्यार्थ्यांना ३२ सायकलचे वाटप केले आहे, माणुसकीची भिंत च्या माध्यमातून पाटोदा तालुक्यातील पहिली शैक्षणिक दानपेटी सुरू करून लोकांकडून तुमच्या कमाई चा एक रुपया गरीब विद्यार्थ्यांसाठी या अभियानातून मदत गोळा करून लोकांकडून जुन्या भंगार सायकल मोफत घेऊन शैक्षणिक दानपेटीतून सायकलची दुरुस्त करून गरजू आणी होतकरू विद्यार्थ्यांना मोफत ३२ सायकली दिल्या आहेत. व दिपावलीच्या वेळी मूठभर चिवडा व एक लाडू अभियान राबवून मसणजोगी वस्ती पाटोदा येथील वंचित लहान मुलांची दिपावली गोड केली आहे. कपडा बँकेच्या माध्यमातून गरजू गरिबांना जुने कपडे मोफत वाटप केले आहेत, व शैक्षणिक दान पिढीच्या माध्यमातून ५३० रजिस्टर गरीब विद्यार्थ्यांना वाटप केले आहेत. कुठला ही स्वार्थ न ठेवता निस्वार्थ भावनेतून दीनदुबळ्यांची सेवा करत आहेत, व अवयव दान, देहदान अभियान राबविण्यात आले आहेत. याच कार्याची दखल घेऊन दत्ता देशमाने यांना रोटरी क्लब बीड यांनी सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरव केला आहे. जगा मध्ये माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर समाजाची सेवा करणे ही एक परम कर्तव्य असते जनसेवा हीच ईश्वर सेवा असे म्हणून हे कर्तव्य व्रत स्वीकारून आपण आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली निस्वार्थ अविरत आणि प्रामाणिक सेवा जनमानसात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करत आहे. आपल्या या सेवाव्रताचा यथार्थ गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे.या साठी हा सेवा गौरव पुरस्कार आपणास प्रदान करण्यात येत आहे असे सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास माणुसकीची भिंत चे मार्गदर्शक ह.भ.प.डॉ.रविंद्र गोरे, माणुसकीची भिंत संयोजक रामदास भाकरे माणुसकीची, वसंत देशमाने, सुरेश देशमाने दत्तात्रय घोडके, महेश कुमार देशमाने, हनुमंत घोडके सर, जय देशमाने, सलीम भाई शेख, रेखा देशमाने, अलका देशमाने, प्रल्हाद देशमाने, वनमाला देशमाने इत्यादी उपस्थित होते.
वादळचे पत्रकार शेख महेशर, लोकवेधचे संजय जावळे, पाटोदा एक्सप्रेसचे नईम पठाण सर,लोकमित्रचे हमीद पठाण, सचिन शिंदे,संदीप शिंदे,चांगदेव गिते सुशिक्षित बेरोजगारांचे नेते ,अशोक जोशी, समीर क्षिरसागर, डॉ.चौरे बळवंत, तुकाराम रंधवे, वैजनाथ बोराटे, किशोर राऊत,यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.