ब्रेकिंग न्युज

सलग नवव्या वर्षी न्यू व्हिजन पब्लिक स्कूलचा १०वी सीबीएसई परीक्षेत १०० टक्के निकाल

न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावी परीक्षेत यश

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― केंद्रिय शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे मार्च-2020 महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवार,दि.15 जुलै रोजी दुुपारी बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाला. त्यात येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू व्हिजन पब्लिक स्कूलने दहावी सी.बी.एस.ई. बोर्ड (इंग्रजी माध्यम) परीक्षेत सलग नवव्या वर्षीही 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.या संस्थेचे सर्वच्या सर्व 113 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अंबाजोगाई येथे राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकार्यांनी 2004 साली श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाने इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणार्या शाळेची स्थापना केली.या शाळेने सलग नवव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. मार्च-2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत संस्थेच्या सर्वच्या सर्व 113 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत नवा उच्चांक निर्माण करून पुन्हा एकदा अंबाजोगाईचे नांव शैक्षणिक क्षेञात उंचावले आहे.बीड जिल्ह्यात या शाळेच्या 32 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले. 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे 32 विद्यार्थी,80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे 27 विद्यार्थी 70 टक्यांपेक्षा जास्त गुण घेणारे 20 विद्यार्थी व 60 टक्यांपेक्षा पुढील गुण घेणारे 34 विद्यार्थी असे सर्व मिळून 113 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेतून प्रथम येण्याचा बहुमान सुयश लक्ष्मीकांत बगळे (98.60 टक्के) या विद्यार्थ्याने पटकावला तर संस्थेत द्वितीय अनुराग आनंद नागापुरे (97 टक्के) व तृतीय अर्जुन संजय शेटे (96.80 टक्के) हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय आले आहेत. न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचे पहिले 32 टॉपर व इतर उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत.त्यात सुयश लक्ष्मीकांत बगळे (98.60 टक्के),अनुराग आनंद नागापुरे (97 टक्के) व तृतीय अर्जुन संजय शेटे (96.80 टक्के),पार्थ राहुल देशमुख (95.60), रागिणी मनिष गुंडरे (95.20),शुभम सुशिल कुलकर्णी (94.80),आदित्य अजय चौधरी (94.80),अंकिता भास्कर आगळे (94.60),तन्मयी सुर्यकांत केंद्रे (94 टक्के),सृष्टी श्रीमंत कावळे (93.80),शिवप्रकाश महेंद्र जाधव (93.80),शिवम गणेश भताने (93.40),जालिंदर संजय शिंदे (93.40), ओंकारेश्‍वर शिवाजी कावळे (93.40), ऋषिराज चिर्ची (93.20),अभिराज रमाकांत यादव (93.20),श्रुती भगवान कुरूंद (93.20),समिक्षा संतोष वट्टमवार (92.80),पियुष जालिंदर आदमाने (92.80),ऋषीका प्रताप जाधव (92.60),गौरव शरद मंत्री (92.40),अथर्व नानासाहेब आगळे (92.20),विवेक नारायणजी रांदड (92),ऋषीकेश अरूण कराड (92), आकाश राजेश पवार (91.60),वैष्णवी उत्तम मदने (91.60), पियुष शाहु पवार (91),राधिका बालाप्रसाद तापडिया (90.20),अमित कैलास आकुसकर (90.20),रजत दत्तात्रय थोरात (90), धीरज धंनजय सातपुते (90.),प्रसन्ना गणेश मुळे,(89.80) इतकी टक्केवारी घेवून सदरील विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यातील अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त झाले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी,प्रा.वसंतराव चव्हाण,डॉ.डी.एच.थोरात,प्रा.नानासाहेब गाठाळ,दिनकर जोशी,डॉ.विवेकानंद राजमाने,प्रा.सुरेश बिराजदार,संस्थेचे अध्यक्ष भुषण मोदी, संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, प्राचार्य व सर्व शिक्षकवृंद आदिंनी अभिनंदन केले आहे.

न्यु व्हिजन पब्लिक स्कुल म्हणजे दर्जेदार इंग्रजी शिक्षण-संकेत मोदी

अंबाजोगाईत मुंबई,पुणे,नागपुर व औरंगाबादच्या धर्तीवर इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी न्यू व्हिजन पब्लिक स्कूल सुरू केले.सतत नऊ वर्षे 100% निकालाची परंपरा कायम ठेवून संस्थेने गुणवत्ता जोपासली आहे.आज या संस्थेचे माजी विद्यार्थी हे देशात व परदेशात मोठमोठ्या पदांवर काम करीत आहेत.ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक क्षेञात अंबाजोगाई पॅटर्न निर्माण केला आहे.नर्सरी.,एल.के.जी.,यु.के.जी.,पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्व विकास, सुसज्ज ग्रंथालय,ऑडिओ व्हिज्युअल क्लासरूम,अत्याधुनिक प्रयोगशाळा,वायफाय परिसर,भाषा विषयक प्रयोगशाळा,गणित व विज्ञान प्रयोगशाळा,ई-लर्निंगद्वारे प्रशिक्षण,प्रत्येक वर्गात सिसिटीव्ही कॅमेरा, कला,हस्तकला,नृत्य, संगीत,कराटे प्रशिक्षण,पुर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी आद्ययावत इमारत बास्केटबॉल ग्राउंड, प्रशस्त क्रिडांगण,स्पर्धा परीक्षेसाठी स्वतंञ वर्ग या सोबतच सुसज्ज वसतीगृह,प्रत्येक खोलीत प्रसाधनगृह,प्रत्येक खोलीत चार विद्यार्थी,संतुलित व पोषक आहार,दैनंदिन योगा आणि व्यायाम. सकाळी व संध्याकाळी अभ्यासवर्ग,अनुभवी व काळजीवाहक कर्मचारी वृंद,लाँड्री सुविधा,मुलींसाठी स्वतंञ सुविधा (उउढत खाली देखरेख),24 तास वैद्यकिय व विद्युत सुविधा यासोबतच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत,स्पर्धेत विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे याकरीता जे-जे करता येईल ते सर्वच सर्वोत्कृष्ट देण्याचा आमचा प्रयत्न आसल्याचे सांगुन संस्थेने सीबीएसई 11 वी व 12 वी विज्ञान वर्ग सुरू केले आहेत.अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांनी दिली आहे.ज्या विद्यार्थांना प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी कृपया अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूल,मोदी लर्निंग सेंटर,रिंग रोड, अंबाजोगाई,जि.बीड येथील (02446- 24569) या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button