अकोट :अकोट मध्ये उन्हाचा पारा ४३° पर्यंत जावून पोहोचलाय उन्हाने जीवाची काहीली होत आहे ,प्रत्येकाला वेळोवेळी पाण्याची गरज भासत आहे . अशातच खेड्या पाड्यातील लोकांना आपल्या दैनंदिन कामासाठी अकोटला तालुक्याच्या ठिकाणी यावेच लागते . अशाच प्रकारे वीज वितरण ऑफिस कडे सुध्दा लोकांची वर्दळ असते अशा वेळेस लोकांची तृष्णा भागावी व त्यांना उन्हापासून दिलासा मिळावा या सामाजिक उद्देशाने गेल्या आठ वर्षांपासून महा पारेषण ऑफिस जवळ दर्यापूर रोड अकोट येथे वीज महा पारेषण कंपनी चे निवृत्त कर्मचारी एक सेवाभावी व्यक्तिमत्व दिनकर राव पाटकर साहेब हे स्वखर्चातून येथे पाणेरी पाणपोई लावतात , यासाठी कोणत्याही प्रकारची मदत ते कोणाकडून घेत नाहीत . बरेच वर्षपासून त्यांचे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे आज त्यांच्या पाणपोई चे उदघाटन महाराष्ट्र राज्य महापारेशन कंपनी १३२ kv सब स्टेशन चे उप कार्यकारी अभियंता श्री मनोज कुमार तायडे साहेब यांचे हस्ते झाले. या प्रसंगी प्रहार चे जिल्हाध्यक्ष श्री तुषार पुंडकर , महावितरण कर्मचारी अजय गजबे,धनराज जी हिवरे, महापारेषण चे संतोशजी गिरी ,अमोल चिंचोलकर, धनराज डहाके, तुषार लंभाडे, सुशांत गायकी व बरेच नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.पाटकर साहेब दरवर्षी वृक्षारोपण सुद्धा स्वखर्चातून करतात
अशा सेवाभावी लोकांची आज समाजाला गरज आहे.