सोयगाव दि.१९(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): जन्मदात्या पित्यानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर सतत व वारंवार जबरी संभोग करून या प्रकारची कुठेही वाच्यता केल्यास धमकी देत जबरी संभोग करण्याचा प्रकार वाकडी ता.सोयगाव गावात उघडकीस आला आहे.याप्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात पित्याविरुद्ध जबरी संभोगाचा गुन्हा दाखल करण्यात येवून आरोपीस शुक्रवारी सोयगाव पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र बाजीराव पाटील(वय ५२)असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून वाकडी(ता.सोयगाव)येथे शेतावर राहणाऱ्या कुटुंबातील पोटाच्या अल्पवयीन मुलीवरच पित्याने घराशेजारील गायीच्या गोठ्यात,डाळिंबाच्या मळ्यात पत्राच्या शेडमध्ये वारंवार पिडीतेच्या इच्छेविरुद्ध (ता.०४)मार्च ते(ता.१७)एप्रिल या कालावधीत वारंवार व सतत तोंड दाबून जबरी संभोग केल्याचा प्रकार सोयगाव तालुक्यात उघडकीस आला आहे.या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.नराधम पित्याला पोलिसांनी शेतातील पत्राच्या शेडमधून अटक केली असून या प्रकरणी ३७६(j)(n)भा.द.वी अन्वये व सहकलम ४,६,८ बाललैंगिक अत्याचार कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधव गुंडीले,सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील,उपनिरीक्षक शारदा वाघमारे,शरद रोडगे,संदीप चव्हाण,अविनाश बनसोडे,वैशाली सोनवणे,चंद्रकांत पाटील,आदि पुढील तपास करत आहे.