सुजय विखे, चंद्रकांत खैरे, उन्मेश पाटील, रक्षा खडसे यांच्यासाठी उद्या प्रचार सभा
मुंबई दि.१९: दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानानंतर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा भाजपच्या स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांची तोफ उद्यापासून (ता. २०) लगेचच राज्यात धडाडणार आहे. उद्या एकाच दिवशी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांसाठी त्या जाहीर सभा घेणार आहेत. सभेसाठी त्या उद्या सकाळी मुंबईहून हेलिकाॅप्टरने रवाना होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात स्वतःच्या बीड मतदारसंघा बरोबरच इतर राज्यातील इतर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवारांसाठी ना. पंकजाताई मुंडे यांनी सुमारे ९० प्रचार सभा घेतल्या. दिवसा हेलिकाॅप्टरने राज्यात दोन किंवा तीन सभा आटोपून संध्याकाळी बीड जिल्हयात वाहनाने चार सभा असा त्यांचा दररोजचा दिनक्रम होता. मागील पंधरा दिवसांत विदर्भ, मराठवाड्यात जवळपास वीस सभा आणि खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्यासाठी बीड जिल्हयात सुमारे ७० सभा त्यांनी घेतल्या. रात्रौ १० वा. पर्यतच्या सर्व सभा आटोपल्यानंतर दिवसभरातील घडामोडी, कार्यकर्त्यांकडून प्रचार यंत्रणेची माहिती घेणे, महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, प्रमुख नेत्यांच्या भेटी असा त्यांचा दिनक्रम दररोज पहाटे पर्यंत चालायचा. भाजप बरोबरच शिवसेना उमेदवारांसाठी देखील त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
उद्यापासून पुन्हा राज्यात झंझावाती दौरा
ना. पंकजाताई यांच्या सभांना राज्यात वाढती मागणी असून उद्यापासून पुन्हा त्या २७ तारखेपर्यंत राज्यात प्रचार दौ-यावर जाणार आहेत. उद्या २० एप्रिल रोजी दुपारी १ वा. सुजय विखे पाटील यांच्यासाठी शेवगांव (नगर) येथे, ३ वा. मेहगांव (औरंगाबाद) येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या करिता, सायंकाळी ६ वा. उन्मेश पाटील (जळगाव) यांच्यासाठी जळगाव येथे तर रक्षा खडसे यांच्यासाठी रात्रौ ८ वा. चोपडा (रावेर) त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. २१ एप्रिल रोजी अंबड (जालना), दहिवडी (सातारा), इंदापूर (पुणे) येथे त्यांच्या सभा होणार आहेत.