अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षक रामकिसन गुंडीबा मस्के यांना बीड येथील जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय राजे यशवंतराव होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार” बीड येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.रामकिसन मस्के हे शहरातील नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासुन गणित विषयाचे अध्यापन करतात.या सोबतच शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व समाजप्रबोधन क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनिय ठरले आहे.मस्के हे मराठा सेवा संघ बीड पुर्वचे जिल्हाध्यक्ष ही आहेत.गोर-गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत.या सोबतच प्रबोधनकार व शिवव्याख्याते म्हणून त्यांनी बीड जिल्ह्याच्या कोणा-कोपर्यांत व्यसनमुक्ती,शेतकरी आत्महत्या, अंधश्रद्धा निर्मुलन,पर्यावरण संवर्धन,फटाके मुक्त दिवाळी, दारूमुक्त गाव,विविध महापुरूषांच्या जयंती व अभिवादन सभा या माध्यमातून आपली व्याख्यान सेवा दिलेली आहे.शिक्षक असून केवळ विद्यार्थीच न घडवता समाज घडविण्याचे कार्य त्यांच्या हातुन होत आहे.एक समाजाभिमुख शिक्षक म्हणून त्यांची सर्वदुर ख्याती आहे.एक चिंतनशिल व्यक्ती म्हणुनही ते ओळखले जातात.महापुरूषांचे चरित्रात्मक लेख तसेच प्रबोधनपर साहित्य त्यांनी विपुल प्रमाणात लिहिलेले आहेत व ते वेळोवेळी विविध दैनिकांमधून,नियतकालिकांमधून प्रकाशित झालेले आहेत. महापुरूषांच्या विचारांचा वसा व वारसा जोपासणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. रामकिसन मस्के यांच्या सर्वांगिण कार्याची नोंद घेवून त्यांना बीड येथील जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या वतीने दिला जाणारा “राज्यस्तरीय राजे यशवंतराव होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार” बीड येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर,माजी मंत्री आ. महादेव जाणकर,माजी आ. रामराव वडकुते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.तो त्यांनी सपत्निक स्विकारला.पुरस्काराचे स्वरूप सन्मानपञ,सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व फेटा असे आहे. “राज्यस्तरीय राजे यशवंतराव होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार” मिळाल्याबद्दल त्यांचे इंजि.डी.डब्ल्यु सोळंके,रामकृष्ण पवार,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले, कार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भास्कर निर्मळ, डॉ.प्रतापसिंह शिंदे,साहित्यिक भारत सालपे,संतराम कराड, प्रबोधनकार ज्ञानोबाराव कदम, मुजीब काझी,मुख्याध्यापक गोविंदराव चव्हाण,पत्रकार रणजित डांगे,अॅड.प्रशांत शिंदे, उद्योजक अतुल शेंडगे,उद्योजक विजय भोसले,पालकर सर,नानासाहेब धुमाळ, विजयकुमार गंगणे,प्रशांत चव्हाण,पत्रकार अरूण गंगणे, संभाजीराव वाळवटे,पांडुरंग देशमुख तसेच नेताजी सुभाषचंद्र प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका आदींसह मित्र परिवार यांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.