शहीद हेमंत करकरे यांच्याबाबतच्या वक्तव्यावरुन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरनी मागितली माफी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): “हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशाचा शाप भोवला,” असे विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला गेला.अखेर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आपले हे विधान मागे घेत माफी मागितली आहे.

“मी तुरूंगात गेल्यानंतर लगेच दीड महिन्यात दहशदवाद्यांनी करकरेंना मारलं” या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी साध्वी यांच्यावर सडेतोड टीका झाली.त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपले विधान मागे घेत असल्याचे म्हटले आहे. ‘माझ्या विधानामुळे शहीदांच्या कुटुंबियांना त्रास झाला आहे. त्यामुळे मी माझे विधान मागे घेत असल्याचे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नसून त्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही.२६/११ च्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात जे पोलीस अधिकारी शहीद झाले ते शहीदच आहेत असे भाजपाचे मत आहे. अशी भूमिका भाजपचे प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी व्यक्त केली.त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते.असे असतानाही त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरुद्ध का खटला दाखल केला नाही असा प्रश्न उपाध्ये यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *