सोयगाव दि.१९(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):
रामनवमीला प्रारंभ झालेल्या अखंड हरीनाम सप्ताहाचा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोप शुक्रवारी हनुमान जयंती निमित्ताने जरंडी ता.सोयगावला करण्यात आला.यावेळी बालाजी संस्थांच्या प्रांगणात ह.भ.प.रवींद्र महाराज परेरव यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली.
हनुमान जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.यावेळी बालाजी संस्थांच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,रात्री आठवडाभर कीर्तनांची मालिका सुरु करण्यात आली होती.या अखंड हरीनाम सोहळ्याचा समारोप शुक्रवारी महाप्रसादाने करण्यात आला,यावेळी सुधीर कुलकर्णी,धनराज पाटील,सुरेश घोंगडे,रवींद्र पाटील,बापू सोनार,गजानन माळी,शांताराम पाटील,आदींनी पुढाकार घेतला होता.