सोयगांव,ता.२६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
तालुक्यातील सावळदबारा ते देऊळगांव गुजरी रस्त्याचे सुरू असलेले काम अंदाजपत्रकानुसार न करता गूत्तेदार मनमानी पध्दतीने करीत असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य महंमद आरिफ महंमद लुकमान यांनी तहसिलदारांकडे केली आहे.
सोयगांव तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा सावळदबारा भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या सावळदबारा ते देऊळगांव गुजरी या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे.सदरील कामात डांबरी रस्त्यावर खोदकाम न करता आहे त्यास्थितीत वरतून डांबर टाकून थातुर मातुर पध्दतीने काम होत असून गूत्तेदार कुणाचेही ऐकत नाही.अनेक वर्षानंतर होत असलेल्या रस्त्याचे काम चांगल्या पध्दतीने करून घ्यावे अशी मागणी सावळदबारा ग्रामपंचायत सदस्य महंमद आरिफ महंमद लुकमान यांनी तहसिलदार प्रवीण पांडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
0