आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चिरागदादा पाटील यांची उपस्थिती
इच्छुकांनी लाभ घ्यावा-आर्ट ऑफ लिव्हिंगचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने वय वर्षे 18 पासून पुढील सर्व वयोगटासाठी तसेच युवकांसाठी विशेष आनंद वर्गाचे आयोजन दिनांक 24 ते 28 एप्रिल 2019 या दरम्यान करण्यात आले आहे.या वर्गाच्या पूर्वनोंदणीसाठी समाजातील सर्वच घटकांतून येणाऱ्या व्यक्तिंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुप्रसिद्ध युवा प्रशिक्षक चिराग दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रशिक्षणाखाली हा वर्ग संपन्न होणार आहे.
एक आंतरराष्ट्रीय युवा प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिराग दादांच्या स्वागतासाठी अंबाजोगाई येथील आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यावर्षीही पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. अंबाजोगाई शहरातील हॅप्पीनेस सेंटर,योगेश्वरी नुतन विद्यालय, प्रशांतनगर या ठिकाणी दिनांक 24 ते 28 एप्रिल या कालावधीत हे शिबीर होत आहे.आनंद अनुभूती शिबीर हे सर्वांसाठी खुले आहे. हे शिबीर सकाळी 6 ते 9 या वेळेत तर फक्त युवकांसाठी ‘युवा आनंद शिबीर’ हे सायंकाळी 5.30 ते राञी 8.30 या वेळेत होईल.वय वर्षे 18 ते 35 गटातील युवकांना या शिबीरात सहभागी होता येईल.
या शिबीराच्या पूर्व नोंदणीला युवकांचा तसेच प्रौढ नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जवळपास सर्वच जागांची नोंदणी पूर्ण होत आली असून इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.गतवर्षी मार्च- 2018 मध्ये चिराग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित युवा आनंद शिबिरास लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यावर्षी पुन्हा एकदा अंबाजोगाई आणि परिसरातील युवकांसाठी तसे एक शिबिर आयोजित करता येईल का ? अशी विचारणा समाजातील सर्वच घटकांनी आणि विशेषतः युवकांनी केली होती.त्यामुळे हे आयोजन करण्यात येत आहे.असे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने कळवले आहे. चिरागदादा पाटील हे एक तज्ञ प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले आहेत.भारतातील अनेक युवकांच्या आयुष्याला विधायक दिशा देण्यासाठी प्रेरक असे प्रशिक्षण ते सतत आपल्या शिबिरातून देत असतात.त्यांच्या या युवा प्रशिक्षण अभियानास आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रवीशंकर यांचा विशेष अनुग्रह प्राप्त झालेला आहे. जगातील एआयआयएमएस,डब्ल्युएचओ,आयआयटी,
आयआयएम व नासा या सुविख्यात संस्थांनी
‘आनंद अनुभूती शिबीर’ याला गौरविलेले आहे. ताण-तनाव, नकारात्मक भाव जसे-राग,भिती,द्वेष व लाजाळूपणा घालविण्यासाठी ‘आनंद अनुभूती शिबीर’ हे उपयुक्त आहे.मर्यादित प्रवेश आहेत.
तेव्हा अधिक माहितीसाठी स्वप्निल चामले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
तणावमुक्त व आनंदी जीवनासाठी शिबीर
योगा,प्राणायाम,ध्यान सोबतच जगदविख्यात सुदर्शन क्रियाद्वारे उत्तम एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास,मानसिक संतुलन,उत्तम आरोग्य, उत्साह,आनंद,कार्यक्षमता,रोग प्रतिकारक शक्ती मध्ये वाढ होते.सुस्पष्ट विचार, शांत झोप आणि उत्तम शारीरिक स्वास्थ,एकाग्र चिंतामुक्त आणि शांत मन,नकारात्मक भावनांची सुलभ हाताळणी,उत्तम निर्णय क्षमता,तणाव मुक्त जीवन,निरंतर आनंदी जीवन आणि प्रत्येक क्षणी आनंदी राहण्यासाठी या शिबीराचा लाभ होतो.