विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी― राजकिशोर मोदी
अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार,दि.6 डिसेंबर रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी सांगितले की,देशात स्वातंत्र्य, समता व बंधुता निर्माण व्हावी यासाठी या महामानवाने आपले संपुर्ण आयुष्य व्यतीत केले. वंचित,दिनदुबळे,गोरगरीब असे लोक ज्यांना तत्कालीन समाजाने मुलभूत स्वातंत्र्यापासुनच दुर ठेवले होते. त्यांना स्वातंत्र्याच्या,विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बाबासाहेबांनी केले.आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांच्या विचारानुसारच सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करीत आहोत.त्यांचे विचार हे येणार्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत असे गौरवोद्गार राजकिशोर मोदी यांनी यावेळी काढले.
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या सहकार भवन,अंबाजोगाई येथील संपर्क कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार,दि.6 डिसेंबर रोजी महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने,नगरसेवक सुनिल व्यवहारे,राजीव गांधी पंचायतराज संघटनचे मराठवाडा अध्यक्ष राणा चव्हाण,बीड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कचरूलाल सारडा,अशोक देवकर,सुधाकर टेकाळे,सचिन जाधव,जावेद गवळी आदींसहीत काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.