पाटोदा (शेख महेशर): ज्योती क्रांती मल्टीस्टेट को-अॉप सोसायटी शाखा पाटोदा कडुन नवनिर्वाचित बचत गट कर्ज योजनेचा शुभारंभ पाटोदा शाखा येथे आमीन महिला बचत गटास धनादेश (चेक) देऊन करण्यात आला.
दि २० एप्रिल २०१९ रोजी पाटोदा शाखेतील आमीन महिला बचत गट क्रांतीनगर, पाटोदा ता. पाटोदा जि. बीड या बचत गटाने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून या कर्ज योजनेचा पाटोद्यात पहिला लाभ घेतला. या वेळी बचत गट समन्वयक अधिकारी सौ. शितल भोकरे मॅडम,ज्योती क्रांती मल्टीस्टेट संस्था पाटोदा शाखेचे शाखाधिकारी श्री. संतोष कोल्हे, कॅशियर सौ.वर्षा चौधरी मॅडम, क्लार्क श्री.पवनकुमार भोकरे आणि बचत गटा च्या सर्व सभासदांच्या उपस्थितीत आमीन बचत गटाला बचत गट समन्वयक आणि शाखा अधिकारी यांच्या हस्ते कर्जाचा धनादेश (चेक) देण्यात आला.