३० वर्षापासून पंढरपूरची पायी महिना वारी करणारे गोविंद डिडूळ

पाटोदा (शेख महेशर): पाटोदा तालुक्यातील नफरवाडी या गावचे रहिवासी श्री.गोविंद दशरथ डिडूळ हे गेल्या तीस वर्षापासून दर महिन्याला पंढरपूरची पायी वारी करत आहेत.
आठ दिवस चालत जाण्यासाठी व आठ दिवस चालत परत येण्यासाठी लागतात, त्यांनी गेल्या तीस वर्षापासून खंड न पडता अखंड नित्यनियमाने पावलो पावली राम कृष्ण हरीचा मंत्र जप करत प्रवास केला आहे. मला कुठली ही अडचण येत नाही साक्षात पांडुरंग माझ्या सोबत आहे याची जाणीव होत असते, असे ते म्हणतात. ऊन वारा पाऊसाची तमा न करता ते चालत राहतात त्यांनी गत तीस वर्षात एकदा ही पायी महिना वारी चुकलेले नाही, प्रपंच करता करता परमार्थ साधावा, यातच खरा आनंद आहे असे ते म्हणतात.स्वतः पाटोदा बस स्टॅन्ड समोर चप्पल बूट शिवण्याचा व्यवसाय करतात. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना देखील मिळेल त्या पैसातून विठ्ठलाची सेवा करतात.
त्याची अद्याप ही कुठल्या ही सामाजिक संघटनेने किंवा वारकरी संघटनेने कसली ही दखल घेतलेली नाही का साधा सत्कार देखील कोणी केला नाही. तरी समाजातील संप्रदायातील लोकांनी त्यांना मदत करावी अशी भावना संप्रदायातील वारकरी मंडळी व्यक्त करीत आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.