उस्मानाबाद – टीम आठवडा विशेष: उस्मानाबाद शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील ताजमहाल टॉकीज जवळ असलेल्या पुलाच्या बाजूच्या घरांतील लोकांच्या व दुकानदारांचे आरोग्याला मोठा धोका होत असल्याचे चित्र उस्मानाबाद मध्ये सध्या दिसत आहे पाण्याचा दुष्काळ पडल्याने भोगावती पात्रात पाणी नसल्यामुळे व दैनंदिन कचरा पुलाखाली टाकल्याने याठिकाणी मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे व रोगराई पसरत आहे.
उस्मानाबाद मध्ये वेगवेगळ्या रोगांनी थैमान घातल्याचे चित्र दिसत आहे.शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी जागा सुद्धा उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे.महिला वॉर्डमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे खाली सतरंजी अंथरुण रुग्णांना झोपण्याची वेळ शासकीय रुग्णालयात आली आहे.याकडे नगरपालिका लक्ष देईल का ?,भोगावती विकासकामांत काय झालं असाही प्रश्न नागरिकांतून होत आहे.