बीड – टीम आठवडा विशेष: पाटोदा तालुक्यातील थेरला हे ३ हजारच्या आसपास लोकसंख्या असलेले एक गाव स्वातंत्र्यपूर्व काळात हीच लोकसंख्या जेमतेम ८०० च्या आसपास असेल परंतु याच थेरला गावाने तेव्हापासून देशसेवेसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाची परंपरा आजतागत या गावाने जोपासली असून याच गावातील स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष सहभागी असलेले ५० स्वातंत्र्य सैनिक यातील काहींनी अक्षरशः आपल्या प्राणांची आहुती देत बलिदानही दिले तर त्या नंतर ७० वर्षा नंतर आजही थेरला गावातील ५० ते ६० तरुण मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर असून देशासाठी लढत असताना याच मातीतील ४ तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे.
या गावातील शहीद स्वातंत्र्य सैनिक बाबुराव राख यांच्या स्मरणार्थ हुतात्मास्मारक उभारण्यात आले आहे.त्या स्मारकावर शासनाकडून दहा लक्ष रुपये खर्च करून दुरूस्ती करण्यात आली आहे.पण तेथे आज स्थितीत पत्ते खेळले जातात हे मोठे दुर्दैव आहे.या कडे पोलीसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे हुतात्मा स्मारक बीड-अहमदनगर महामार्गावर आहे.पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे परिसरातील म्हणणे आहे.