ब्रेकिंग न्युजरस्ते अपघातसोयगाव तालुका

सोयगाव-जरंडी रस्त्यावर भीषण अपघातात ४ गंभीर ; दोघांना जळगावला हलविले

सोयगाव दि.२३(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): जरंडीकडून सोयगावकडे जाणाऱ्या भरधाव ओमिनी गाडीने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास जरंडी गावाजवळ घडली.यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने उपचारासाठी जळगावला सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या घटनेमुळे जरंडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात रस्ता अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
सोयगावकडून जरंडीकडे मोटारसायकलवरून येणाऱ्या विशाल ज्ञानेश्वर मोरे(वय २२),वैभव त्रंबक मोरे(वय २२ दोघे रा.जरंडी)हे मोटारसायकलने जरंडीकडे येत असतांना जरंडीकडून भरधाव येणाऱ्या ओमिनी वाहन क्रमांक-एम.एच-२० बी,सी-१९६ या वाहनाने दोघांना समोरून भरधाव धडक देवून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहे.दरम्यान ओमिनी वाहनातील निर्मल भगवान बोराडे(वय २४)किशोर आनंदा सोनवणे(वय २२)दोघे रा.कंकराळा या दोघ किरकोळ जखमी झाले आहे.या दोघांवर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत असून गंभीर जखमी झालेल्या वैभव मोरे व विशाल मोरे या दोघांना तातडीने गंभीराअवस्थेत जळगावला हलविण्यात आले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    वैद्यकीय अधिकाऱ्याविना असलेल्या ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात कोणीच हजर नसल्याने पुन्हा एकदा नागरिकांचा संताप अनावर झाला होता.दरम्यान सायंकाळ नंतर सोयगाव ग्रामीण रुग्नालयाला वैद्यकीय अधिकारीच नसल्याने आरोग्याचे तीनतेरा झाले आहे.त्यामुळे सायंकाळनंतर गंभीर रुग्णावर सोयगावला उपचार होणे नित्याचेच झाले आहे.दरम्यान अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतरही कर्मचारीही हजर नसल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.