पाटोदा (शेख महेशर): दुष्काळा मुळे शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारी, गहु किंवा इतर उत्पादन झालेले नाही. त्या साठी शासनाने स्वस्त धान्य दुकाना मार्फत प्रति महिना मानसी किमान १० किलो धान्य द्यावे असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठविलेल्या लेखी निवेदनात शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्या मार्फत कळविले आहे.
आज शेतकरी, शेतमजुर, कामगार, गंवडी (मिस्त्री) व त्यांच्या हाता खालील अकुशल कामगार आणि इतर सर्व दुष्काळाच्या विळख्यात सापडलेल्या जनतेला शासनाने पुढील खाण्या योग्य धान्य येई पर्यत शासनाच्या स्वस्त धान्य दुकाना मार्फत प्रति महिना माणसी किमान १० किलो धान्य त्या मध्ये ७ किलो गहु २ रुपये किलो प्रमाणे तर ३ किलो तांदुळ ३ रुपये किलो प्रमाणे देण्यात यावे. जेणे करुन दुष्काळा मुळे त्रस्त असलेल्या व दुष्काळामध्ये होरपळून निघत असलेल्या जनतेला किंवा त्या गोरगरिबांना जगण्यासाठी आधार मिळेल. आज दुष्काळा मुळे शेतकऱ्याबरोबरच सर्व स्तरातील लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे शासनाने विलंब न करता तात्काळ जनतेला जगण्याचा आधार देण्यासाठी शासनाच्या स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरीत करावे.अशा अशयाचे लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांना शेतकरी कामगार पक्षाचे भाई विष्णुपंत घोलप यांनी कळविले आहे. या निवेदनाच्या प्रति माहितीस्तव मा.ना.पंकजाताई मुंडे (ग्रामविकास तथा महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री बीड जिल्हा.), धनंजय मुंडे ( विरोधी पक्ष नेते विधान परिषद महाराष्ट्र.),भाई मा.आ.जयंत पाटील (भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणिस) यांना कळविले आहे.