अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ तळेगाव ढमढेरे, मांडवगण फराटा,आळंदी,आणि भोसरी येथे सभा
पुणे दि.२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक तथा राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे उद्या बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ एका दिवसात चार सभा घेणार आहेत.
सकाळी दहा वाजता शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे बाजार मैदानावर त्यांची पहिली सभा होणार आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता मांडवगण फराटा येथे वाघेश्वर मंदिर परिसरात होणाऱ्या सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी साडेचार वाजता त्यांची खेड तालुक्यातील आळंदी येथे वडगाव चौकात जाहीर सभा होणार आहे.भोसरीच्या गाव जत्रा मैदानात रात्रौ आठ वाजता त्यांची चौथी जाहीर सभा होणार आहे.या लोकसभा निवडणुकीत मुंडे यांनी आत्तापर्यंत १६ लोकसभा मतदारसंघ मतदारसंघात ६७ पेक्षा जास्त सभा घेतल्या आहेत.