बीड जिल्हा

माजलगाव मतदारसंघातील मोटेवाडी येथे रमेशराव आडसकर यांचे श्रमदान; वॉटरकप कामास भेट,केली आर्थिक मदत

धारूर - टीम आठवडा विशेष : पाणी फाऊंडेशनच्या वतीने माजलगांव मतदारसंघातील धारुर तालुक्यातील मोटेवाडी येथे गेल्या 15 दिवसांपासून श्रमदान सुरु आहे.मोटेवाडी हे 28 उंबर्‍याचे छोेटेशे गाव आहे.गावची लोकसंख्या 180 इतकी आहे.गावकर्‍यांनी एकत्र येत श्रमदानातून गाव पाणीदार करण्याचा संकल्प सोडला. गावातील लहान,मोठी माणसे श्रमदानाच्या कार्याला लागली. जिल्ह्यातील नेते रमेशराव आडसकर यांनी मंगळवार,दि.23 एप्रिल रोजी मोेटेवाडी गावास भेट दिली व श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. श्रमदान केले.तसेच मोटेवाडी गावकर्‍यांना वॉटर कपच्या कामासाठी आर्थिक मदतही दिली.यावेळी श्रमदानात सहभागी झालेल्या कु.लावण्या डोंगरे या अपंग मुलीच्या श्रमदानातील कामाचे तोंड भरुन कौतुक केले. या मुलीने आपल्या कार्यातून प्रेरणा दिली आहे.मुलींचे श्रमदान पाहून गावकरी भारावले आहेत.रमेशराव आडसकर यांनी मंगळवारी माजलगांव मतदारसंघातील धारुर तालुक्यातील मोेटेवाडी येथे सुरु असलेल्या वॉटर कपच्या कामास भेट दिली व स्वतः श्रमदान केले.यावेळी त्यांच्या सोबत भारतराव पिंगळे,माजी सभापती अर्जुनराव तिडके,धारूर पंचायत समितीचे उपसभापती शिवाजीराव काचगुंडे, सुरज देशमुख,शाहू कोळकर,भरत कोळकर यांच्या सहित पंचक्रोषीतील प्रमुख कार्यकर्ते ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मोटेवाडी ग्रामस्थांनी गावासाठी चांगला रस्ता आसावा अशी मागणी केली असता.सदर रस्त्यांचा प्रश्‍न लवकरच सोडविला जाईल.अशी ग्वाही आडसकर यांनी यावेळी दिली.प्रारंभी मोटेवाडी गावास जाताना माजलगांव मतदार संघातील हिंगणी (खुर्द), हिंगणी (बु.) या गावास भेट देवून येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी रमेशराव आडसकर यांनी शेख रज्जाक, बिभिषण शेंडगे,छत्रभुज सोळंके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. आडसकरांच्या भेटीने मोटेवाडी,हिंगणी (खुर्द), हिंगणी (बु.) या गावचे गावकरी आनंदीत झाले होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.