औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजरस्ते अपघातसोयगाव तालुका

सोयगाव: भरधाव ओमिनीच्या धडकेत गंभीर दोघांचा उपचारादरम्यान जळगावला मृत्यू

सोयगाव दि.२३(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): सोयगाव-जरंडी रस्त्यावर भरधाव ओमिनी वाहनाने दुचाकीस्वारांना दिलेल्या समोरासमोरील धडकेत गंभीर जखमी झालेल्या जरंडी गावातील दोघांचा जळगावला सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे जरंडी गावात शोककळा पसरली आहे.दोघांवर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दोन्ही बावीस वर्षीय तरुण असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

विशाल ज्ञानेश्वर मोरे(वय २२)आणि वैभव त्रंबक मोरे(वय २२)दोघे रा.जरंडी असे मृतांचे नावे असून सोमवारी रात्री सोयगावकडून जरंडीकडे येत असतांना सोयगावजवळ झालेल्या ओमिनी वाहनाच्या धडकेत हे दोघे गंभीर तर उर्वरित दोघे किरकोळ जखमी झाले असल्याने या दोघांना तातडीने जळगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता,दोघांचा मंगळवारी पहाटे दोन वाजता मृत्यू झाला आहे.भरधाव येणाऱ्या ओमिनी वाहन एम-एच-२० ०१९६ या वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने या दोघांच्या मेंदूला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचाह मृत्यू झाला आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार-

दरम्यान जरंडी गावात दुपारी शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून गावात दिवसभर शोककळा पसरली होती.

ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर संताप-

अपघातग्रस्त रुग्णांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी प्राथमिक उपचार न मिळाल्याने या अपघातग्रस्त तरुणांचा मृत्यू झाल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात असून,तालुका आरोग्य विभाग एक लाख रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.तालुका रुग्णालयाला दोन महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने सोयगाव परिसरातील रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अपघात ग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार न झाल्याने जळगाव प्रवासात त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.