औरंगाबाद: सोयगाव तालुक्यात ६७ टक्के सरासरी मतदान ; भर उन्हात मतदारांचा उत्साह

सोयगाव दि.२३: सोयगाव तालुक्यात लोकसभा निवडणुकांसाठी ६७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने मंगळवारी सायंकाळी उशिरा दिली असून मंगळवारी तालुक्यातील दोन लोकसभा मतदार संघासाठी जोडलेल्या तब्बल ८३५१९ मतदारांपैकी ६१८३६ मतदारांनी दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी मतदानाचा हक्क बजावला.दरम्यान भर उन्हातही मतदारांचा मोठा उत्साह पहावयास मिळाला होता.
जालना लोकसभा मतदार संघातील ५९ मतदान केंद्रावर ४७२३७ मतदारांपैकी ३१५६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून बनोटी मंडळातील औरंगाबाद लोकसभा मतदार संघात असलेल्या २९ गावात ३५१७७ मतदारांपैकी २६२१७ मतदारांनी हक्क बजावला आहे.सोयगाव शहरात ६१९९ पैकी ३८५८ मतदारांनी मतदान केले असून शहरात ६२ टक्के मतदान झाले आहे.जरंडी मतदान केंद्रावर ७२ टक्के मतदान झाले असून आमखेडा मतदान केंद्रावर २६९० पैकी १७९८ मतदारांनी हक्क बजावला आहे.दरम्यान दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी निवडणूक विभागाकडून व्हील चेयर द्वारे मतदान केंद्रात पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पांडे,पोलीस निरीक्षक माधव गुंडीले,सहायक पोलीस निरीक्षक शेख शकील यांनी तालुक्यात मतदान केंद्रांवर करडी नजर ठेवल्याने तालुक्यात शांततेत मतदान झाले.

लोकप्रतिनिधीनी बजावला हक्क:

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंग्माथ काळे,जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे,नगराध्यक्ष प्रतिभा बोडखे,उपजिल्हा प्रमुख राजू राठोड,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू दुतोंडे,भाजप तालुकाध्यक्ष जयप्रकाश चव्हाण,सभापती धरमसिंग चव्हाण,पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे,मराठा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील ,मराठा प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष विजय काळे,आदींनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.