बीड जिल्हा

बीड: 'सालसिदबाबाच्या नावान चांगभल'च्या जयघोषाने दुमदुमणार जिरेवाडी परिसर ; यात्रेची जोरदार तयारी सुरू

बीड दि.२४(निलेश चाळक): मराठवाड्यातील भाविक भक्ताचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थानाच्या यात्रेची सुरूवात रविवार पासून होत आहे त्यामुळे सालसिदबाबाच्यानावां चागंभलच्या जयघोषाने दुमदुमणार जिरेवाडी परिसर दुमदुमून जाणार आहे त्यामुळे सालसिद बाबाच्या मदींर परिसरांत रविवारी हजारो भाविक गर्दी करणार आहेत.
२८ एप्रिल रोजी श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थान जिरेवाडी येथील यात्रा उत्संव सुरू होत आहे आणि हा यात्रा उत्संव २८ एप्रिल ते २९ एप्रिल असा असनार असून या यात्रा उत्सवाची तयारी यात्रेच्या १५ दिवसा आगोदर केली जाते उद्या यात्रा असेल तर आज गावातील सालसिंद बाबा भक्त गंगाला पाणी आणण्यासाठी जातात व दुसर्या दिवशी सकाळी सालसिंद बाबा भक्तं ते गावात आल्यानतंर देवाच्या मुर्तीची गावातून गाजत वाजत मिरवणूक काढली जाते व मदींरात गंगाहून आणलेले पाणी मदीरात टाकले जाते यासदर्भात एक विशेष गोष्ट म्हणजे ज्या सालसिंद बाबा भक्ताचे आगोदर मदींरात पाणी पडेल त्या सालसिंद बाबा भक्ताला सालसिद बाबा (देव) साक्शात दर्शन देतो बोलले जाते व नतंर श्री क्षेत्र सालसिद बाबा मदींरासमोर सालसिंद बाबा भक्तं लेझीम खेळतात व लेझीम पथकाला पहाण्यासाठी मोठी गर्दी होत असते व या यात्रा उत्संवानिमीत्त जिल्हाभरातील भाविक भक्त दर्शनासाठी जिरेवाडी येथे मोठी गर्दी करतात व येथील श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थानाला कोबंड्याच्या मटनाचा नैव्यद्य असतो व या ठिकाणी जिल्हयाबाहेरून भविक भक्त दर्शनासाठी येथे येत असतात व दर्शनासाठी भविक भक्ताना रात्री १२ वाजेपर्यत मदींर उघडे असते व याच दिवशी रात्री ११ते ११.३० वाजेपर्यत श्री क्षेत्र सालसिद बाबांच्या(देवाच्या) पालखिची गावातून मिरवणूक काढली जाते व यामिरवणूकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी विशेष पोलीस बदोंबस्त तैनात करण्यात येतो व येथे येणार्या भविक भक्तानसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्यात येतात व या ठिकाणी दर्शनासाठी भविकाच्या मोठ्या रागा लागतात परंतू दर्शनासाठी फक्त पुरूष वर्गालाच मदीरांत प्रवेश दिला जातो आणि महीला मदींराबाहेरून दर्शन घेतात या देवस्थाना विषयी आणखी एक विशेष बाब म्णजे घरी किंवा शेतात साप निदर्शानास आला आल्यास या मदींर परिसरातील वाळु (माती) घरात किंवा शेतात शिंपडल्यास तो साप पुन्हा आपल्या निदर्शनास येत नाही
व पुन्हा दुसर्या दिवशी ही खुप गर्दी असते त्याच दिवशी श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थान च्या वतीने दुपारी ४ वाजता कुस्त्याचे आयोजन करण्यात येते या कुसंत्याचा सामना पाहण्यासाठी जिल्हाभरातून पैलवान येत असतात आणि या यात्रा उतस्वादरम्यान अनेक राजकिय व समाजिक क्षेत्रातील पदाधिकारी याठिकाणी भेट देतात व गावातील लोक श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थान जिरेवाडी येथील यात्रा उत्संव शातंतेत पार पाडतात

श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थानाला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळेल का ?

गेल्या आनेक वर्षापासून जिरेवाडी येथे श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थानाच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते या देवस्थानाला कोंबड्याच्या मटनाचा नैव्दय दाखवला जातो ही परंपरा गेली अनेक वर्षापासून चालत आली असून आज ही परंपरा अशीच आहे या यात्रे दरम्यान जिल्हयातून हाजारोच्या सख्येंने भविक भक्त दर्शनासाठी येत आसतात आणि देवस्थानाच्या विकासासाठी या श्री क्षेत्र सालसिद बाबा देवस्थानाला तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी ग्रामस्थासह येथे येणाऱ्या भाविक भक्तांतून होत आहे

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.